मोकळीक द्या, आम्ही धडा शिकवू!
By admin | Published: October 14, 2016 01:59 AM2016-10-14T01:59:03+5:302016-10-14T01:59:56+5:30
किस्तानातील जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याने पुन्हा भारताविरोधात गरळ ओकायला सुरुवात केली
नवी दिल्ली : पाकिस्तानातील जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याने पुन्हा भारताविरोधात गरळ ओकायला सुरुवात केली. भारतात दहशतवादी कृत्ये करण्यासाठी काश्मीरमध्ये दहशतवादी गट वाढविण्याची हिम्मत पाकिस्तानने आता दाखवायला हवी, असे त्याने म्हटले आहे.
जैश-ए-मोहम्मदच्या अल-कलाम या नियतकालिकात त्याने म्हटले आहे की, पाकिस्तानने याबाबत वेळेत निर्णय न घेतल्यास, पाकिस्तान काश्मीरमधील ऐतिहासिक संधी गमावेल. मसूद अझहरच्या या मागणीमुळे भारत आणि पाकिस्तानातील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे. काश्मीरमधील दहशतवादी हालचाली वाढवण्यासाठी पाकिस्तान सरकारने अधिक हिम्मत दाखवल्यास, काश्मीरमधील समस्या, दोन देशांतील पाण्याचा वाद संपुष्टात येतील. हे पाकिस्तान सरकारला जमत नसेल तर, सरकारने किमान दहशतवाद्यांना तरी मोकळीक द्यावी. आम्ही भारताला धडा शिकवू, असेही मसुद अझहरने नमूद केले आहे.
केवळ याच मार्गाने १९७१ च्या युद्धाच्या कडवट आठवणी पुसल्या जातील, असेही म्हणत अझहरने विष पेरण्याचे काम केले आहे.