Manish Sisodia Arrest: “ED-CBI ताब्यात द्या, फक्त २ तासांत PM मोदी, अमित शाह अन् गौतम अदानींना अटक करतो”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 06:57 PM2023-02-27T18:57:58+5:302023-02-27T18:59:15+5:30
Manish Sisodia Arrest: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा दावा करण्यात आला आहे.
Manish Sisodia Arrest: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कथित मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. अटकेपूर्वी सीबीआयने सिसोदिया यांची सुमारे ८ तास चौकशी केली. अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांची सीबीआय कार्यालयात चौकशी झाली. यानंतर आता सिसोदिया यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. यावरून केंद्रातील मोदी सरकारवर आम आदमी पक्षाने सडकून टीका केली. मुंबईतही अटकेविरोधात निदर्शने करण्यात आली. यातच आम आदमी पक्षाच्या एका खासदाराने पंतप्रधान मोदी आणि अदानी समूहाचे गौतम अदानींना अटक करण्याची भाषा केली आहे.
दिल्लीतील आम आदमी पक्षाचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक झाल्यानंतर भाजप आणि आप मधील संघर्ष वाढला आहे. सीबीआय कार्यालयाजवळ निदर्शने करत असताना आम आदमी पक्षाच्या नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर काही तासांनी त्यांना अटक करण्यात आली. यानंतर काहींना सोडून देण्यात आले. यानंतर खासदार संजय सिंह यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
CBI ताब्यात द्या, फक्त २ तासांत मोदी-अदानींना अटक करतो
मनीष सिसोदिया यांना अटक करणे हा मोदी सरकारचा भ्याडपणाचा परिचय आहे. मला सीबीआय द्या, २ तासात मोदी आणि अदानींना अटक करतो, असा इशारा संजय सिंह यांनी दिला. तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. ईडी आणि सीबीआय आपल्यासोबत असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उद्योगपती गौतम अदानी यांना दोन तासांत अटक करू, असा दावा संजय सिंह यांनी केला आहे.
दरम्यान, आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर खोट्या प्रकरणामध्ये सीबीआयमार्फत अटक केल्याबद्दल आम आदमीतर्फे चर्चगेट स्थानक ते भाजप प्रदेश कार्यालय निषेध मोर्चा काढण्यात आला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"