"रामदेव बाबांना नोबेल द्या"! ट्विटरवर 'कोरोनिल'वरून गट 'सक्रीय'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 02:39 PM2020-06-24T14:39:32+5:302020-06-24T14:44:11+5:30

कोरोनिल औषधाच्या चाचणीवेळी तीन ते सात दिवसांत कोरोनाचे ठणठणीत रुग्ण बरे झाल्याचा दावा केला होता.

Give Nobel to Ramdev Baba! Why is Coronil getting support on Twitter? | "रामदेव बाबांना नोबेल द्या"! ट्विटरवर 'कोरोनिल'वरून गट 'सक्रीय'

"रामदेव बाबांना नोबेल द्या"! ट्विटरवर 'कोरोनिल'वरून गट 'सक्रीय'

Next

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवर औषध लाँच करून पतंजलीचेरामदेव बाबा अडचणीत आले आहेत. त्यांनी केवळ 7 दिवसांत कोरोनाला मात देण्याचा दावा करणारी दिव्य कोरोना किट मंगळवारीच बाजारात आणली होती. मात्र, यानंतर लगेचच आयुष मंत्रालयाने पतंजलीच्या या औषधाच्या जाहिरातींवर बंदी आणली होती. यावरून ट्विटरवरहीरामदेव बाबा चर्चेत राहिले असून एक गट त्यांना नोबेल पुरस्कार देण्याची मागणी करत आहे. 


या औषधाच्या लाँचिंगवेळी बाबा रामदेव हजर होते. त्यांनी या औषधाच्या चाचणीवेळी तीन ते सात दिवसांत कोरोनाचे ठणठणीत रुग्ण बरे झाल्याचा दावा केला होता. यावर आयुष मंत्रालयाने पतंजलीवर आरोप करत नियम मोडल्याचा ठपका ठेवला आहे. तर दुसरीकडे सोशल मिडीयावर या कोरोनिल औषधाची चर्चा आहे. काहींनी याला आयुर्वेदाची शक्ती म्हटले आहे. तर काहींनी रामदेव बाबांच्या हेतूवरच शंका घेतली आहे. एक गट असा आहे की, रामदेव बाबांना नोबेल पुरस्कार देण्याची मागणी करू लागला आहे. 


रामदेव बाबांच्या य़ा औषधावर अनेक डॉक्टरांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेक अॅलोपॅथिक डॉक्टरांनी ही घोर फसवणूक असल्याचे आरोप केले आहेत. तर कोणत्याही सरकारी परवानगी, चाचणीशिवाय कोण कसे औषध लाँच करू शकते, असा सवाल उपस्थित केला आहे. काहींनी तर य़ाला सरकारचीच फूस असल्याचे म्हटले आहे. तर काही सोशल मिडीयावरील नेटकरी असे होते की, ते या साऱ्याची मजा घेत होते. त्यांनी रामदेव बाबांना मेडिसिनमधील नोबेल पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. तर काहींनी हे औषध बोगस निघाल्यास रामदेव बाबाना तुरुंगात टाकण्याची मागमी केली आहे. 


उत्तराखंडच्या आयुर्वेद ड्रग्स लायसन्स प्राधिकरणाने पंतजलीच्या कोरोनिल औषधावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. प्राधिकरणाचे उपनिर्देशक यतेंद्र सिंह रावत म्हणाले की, बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीला कोरोनाचे औषध नव्हे तर इम्युनिटी बूस्टर आणि सर्दी-खोकल्याचं औषध म्हणून परवाना जारी केला होता. पतंजलीने कोरोनावर औषध आणल्याचा दावा केला असल्याचं मीडियातून समजलं असं अधिकाऱ्यांनी सांगितले. 

आयुष मंत्रालयाने दिले आहेत जाहिरात न करण्याचे आदेश 
देशात आणि जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी करोनावरील लस शोधण्यावर भर देण्यात येत आहे. अशातच योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावरील आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लॉन्च केले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. मात्र पतंजली कंपनीने योग्य तपासणी होईपर्यंत कोरोनिल औषधाची जाहिरात न करण्याचे आदेश आयुष मंत्रालयाने दिले आहेत.

अन्य महत्वाच्य़ा बातम्या...

"नेपाळला संकटात खायला घातले, आता आम्हालाच डसला"; बिहारचे नागरिक संतप्त

4000 कोटींचा पाँझी घोटाळा दडपला; IAS विजय शंकर यांचा घरातच मृतदेह सापडला

India China FaceOff: पुन्हा डोकलाम? लडाखमध्ये फेल झालेल्या चीनचा नवा डाव; भूतानला जाळ्यात ओढणार

न भूतो! पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महागले; राजधानीत विक्रम

India China Face Off: भारताला धडा शिकवायला गेला अन् चीनचा जनरल झाओ दुसऱ्यांदा तोंडघशी पडला

चिंगारी भडकली! चीनच्या TikTok ला टक्कर देणार भारतीय अ‍ॅप

अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला

Web Title: Give Nobel to Ramdev Baba! Why is Coronil getting support on Twitter?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.