Corona Virus: आजवर कोरोना बाधित न झालेल्यांसाठी महत्वाचे; तज्ज्ञांनी सांगितले, एकतरी लस द्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 08:22 AM2021-07-05T08:22:32+5:302021-07-05T08:23:55+5:30
corona virus vaccination: जी स्थिती पुण्याची आहे, तीच दिल्लीची असल्याची दिसत आहे. पुण्यात करण्यात आलेल्या सीरो सर्ह्वेमध्ये ८० टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह होऊन गेल्याचे दिसले आहे.
दिल्लीमध्ये कोरोना नियंत्रणात आला आहे. अन्य राज्यांचीही तशीच काहीसी परिस्थिती आहे. परंतू तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ज्या लोकांना आजवर कोरोना (corona virus) झालेला नाही, त्यांनी या काळात कोरोना लसीकरण (corona vaccination) करून घेणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. (who has not infected yet, gave them corona vaccine.)
आजवर ज्या लोकांनी कोरोनाला लांब ठेवले आहे, म्हणजेच कोरोना अद्याप झालेला नाहीय त्यांना कमीत कमी एक डोस तरी द्यावा असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तेव्हाच दिल्लीतील भविष्यातील परिस्थिती नियंत्रणात राहू शकते असे त्यांनी म्हटले आहे.
सफदरजंग हॉस्पिटलचे कम्युनिटी मेडिसिनचे एचओडी डॉ. जुगल यांनी सांगितले, जी स्थिती पुण्याची आहे, तीच दिल्लीची असल्याची दिसत आहे. पुण्यात करण्यात आलेल्या सीरो सर्ह्वेमध्ये ८० टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह होऊन गेल्याचे दिसले आहे. अशीच परिस्थिती दिल्लीत आहे. डॉक्टरांनी सांगितले की, १० ते २० टक्के लोकसंख्या अशी आहे की ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. या लोकांना सर्वात आधी कोरोना लस देण्यात यावी.
धर्मशिला कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर अंशुमान कुमार यांनी सांगितले की, कोरोना सध्या शांत आहे. सर्वांना आताच कोरोना लस मिळायला हवी. जुलैचा पूर्ण महिना हातात आहे, या काळात आपण जर अधिकाधिक लोकांना लस दिली तर पुढील काळात लवकरात लवकर कोरोनाचा विस्तार कमी करण्यात यशस्वी होऊ शकतो.
कुमारने सांगितले, ज्या प्रकारे डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिअंटचा संक्रमण दर पहायला मिळाला आहे, तो त्रास देऊ शकतो. यामुळे आपल्याला लवकरात लवकर कोरोना न झालेल्या लोकांना कमीत कमी एक तरी लसीचा डोस द्यावा.