आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्या
By admin | Published: August 2, 2016 04:52 AM2016-08-02T04:52:02+5:302016-08-02T04:52:02+5:30
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्या, अशी मागणी सोमवारी सत्ताधारी रालोआतील सहकारी पक्ष तेलगू देसम आणि विरोधी पक्षातील वायएसआर काँग्रेस यांनी केली.
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्या, अशी मागणी सोमवारी सत्ताधारी रालोआतील सहकारी पक्ष तेलगू देसम आणि विरोधी पक्षातील वायएसआर काँग्रेस यांनी केली. या मुद्यावरून या पक्षांनी लोकसभेत घोषणाबाजी केली.
लोकसभेत सोमवारी सकाळी कामकाज सुरू होताच वायएसआर काँग्रेसचे चार सदस्य हातात फलक घेऊन अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या समोरील जागेत घोषणाबाजी करू लागले, तर तेलगू देसमचे सदस्यही हातात फलक घेऊन समोरच्या रांगेत दाखल झाले आणि तेही घोषणाबाजी करू लागले. ‘राज्याला विशेष दर्जा मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा ते देत होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर आंध्र प्रदेशला हवा असलेला निधी दिला जात नसल्यामुळे राज्यातील तेलगू देसम पक्ष मोदी सरकारवर नाराज आहे. भाजप आणि तेलगू देसम यांच्यातील हा तणाव एवढा टोकाला गेला आहे की, चंद्राबाबू यांच्या नेतृत्वातील तेलगू देसम पक्ष रालोआतून बाहेरही पडू शकतो.