‘बलात्कार केलेल्या मुलीचे मूल आम्हाला द्या’, न्यायमूर्तींनी वकिलांस सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 07:43 AM2023-04-25T07:43:33+5:302023-04-25T07:43:56+5:30

बलात्कार करणाऱ्याच्या पालकांची याचिका घेऊन त्याचे वकील कोर्ट रूममध्ये पोहोचले.

'Give us the child of the raped girl', the judge told the lawyers in SC | ‘बलात्कार केलेल्या मुलीचे मूल आम्हाला द्या’, न्यायमूर्तींनी वकिलांस सुनावले

‘बलात्कार केलेल्या मुलीचे मूल आम्हाला द्या’, न्यायमूर्तींनी वकिलांस सुनावले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सोमवारी सुप्रीम कोर्टात एक विचित्र प्रकरण सुनावणीसाठी नोंद झाले होते. बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या पुरुषाच्या पालकांनी त्याच्या मुलाने बलात्कार केलेल्या मुलीच्या पोटी जन्मलेले मूल त्यांच्याकडे सोपवण्याची याचिका केली होती. ही याचिका एकूण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड प्रचंड संतापले. येथे येणाऱ्या याचिकांना काही मर्यादा आहे की नाही, असे याचिका फेटाळताना ते म्हणाले.

बलात्कार करणाऱ्याच्या पालकांची याचिका घेऊन त्याचे वकील कोर्ट रूममध्ये पोहोचले. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. जेव्हा वकिलाने याचिका वाचली तेव्हा सरन्यायाधीशांनी त्याला फटकारले आणि म्हणाले की, तुमचा मुलगा बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात आहे आणि तुम्हाला ते मूल (बलात्कारानंतर जन्मलेले) तुमच्याकडे सोपवायचे आहे? 

कोर्ट म्हणाले...
यावर वकील म्हणाले- ही मागणी मुलाच्या कल्याणासाठी केली जात आहे. यावर न्यायमूर्ती नरसिम्हा म्हणाले की, तुम्ही काय बोलत आहात हे तुम्हाला माहीत आहे का? सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, सुप्रीम कोर्टात येणाऱ्या याचिकांना काही मर्यादा असावी, ही याचिका फेटाळली जात आहे.

Web Title: 'Give us the child of the raped girl', the judge told the lawyers in SC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.