'जन गन मन'सारखा समान दर्जा 'वंदे मातरम'ला द्या !
By Admin | Published: November 17, 2016 05:36 PM2016-11-17T17:36:49+5:302016-11-17T17:36:49+5:30
भारताचे राष्ट्रगीत 'जन गन मन' सारखा समान दर्जा 'वंदे मातरम'ला द्या
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - भारताचे राष्ट्रगीत 'जन गन मन' सारखा समान दर्जा 'वंदे मातरम'ला द्यावा, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. जन गन मन' सारखा समान दर्जा 'वंदे मातरम'ला द्या, यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर केंद्र सरकारच्या प्रतिक्रियेची वाट पाहत असल्याचंही यावेळी न्यायालयानं सांगितलं आहे.
दरम्यान, याचिकेवर मुख्य न्यायाधीश जी रोहिणी आणि न्यायाधीश संगीता धिंग्रा सेहगल यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली आहे. या याचिकेवर केंद्र सरकारनं 8 फेब्रुवारी 2017पर्यंत मत नोंदवावं, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. दिल्लीतले स्थानिक रहिवासी असलेले गौतम आर. मोरारका यांनी भारताचे राष्ट्रगीत 'जन गन मन' सारखा समान दर्जा 'वंदे मातरम'ला द्यावा, यासंदर्भात याचिका दाखल केली आहे.
मोरारका यांच्या मते, 'जन गन मन' सारखा समान दर्जा 'वंदे मातरम'ला देऊन त्याचाही सन्मान करायला हवा. अनेक जण वंदे मातरम हे राष्ट्रगीताबाबत अनादर व्यक्त करतात. त्यामुळे त्याला राष्ट्रगीतासारखा समान दर्जा देण्याची गरज आहे.1950मध्ये राष्ट्रपतींनीही 'वंदे मातरम'चा 'जन गन मन'सारखा आदर राखावा, असं म्हटलं होतं. याचीही आठवण मोरारका यांनी करून दिली आहे.