‘निकालापर्यंत आय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश द्या’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 04:38 AM2019-11-15T04:38:29+5:302019-11-15T04:38:45+5:30
सर्वोच्च न्यायालयाचे सात न्यायाधीशांचे खंडपीठ शबरीमालासंदर्भात निकाल देत नाही तोवर सर्व वयोगटांतील महिलांना तेथील आय्यप्पा मंदिरात प्रवेश देणे सुरूच ठेवावे,
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सात न्यायाधीशांचे खंडपीठ शबरीमालासंदर्भात निकाल देत नाही तोवर सर्व वयोगटांतील महिलांना तेथील आय्यप्पा मंदिरात प्रवेश देणे सुरूच ठेवावे, अशी मागणी महिला चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यात तृप्ती देसाई यांचाही समावेश आहे.
त्या म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयाच्या विस्तारित खंडपीठाने निकाल देईपर्यंत आय्यप्पा मंदिरात प्रवेश करण्यापासून सर्व वयोगटातील महिलांना कोणीही रोखू शकत नाही. या मंदिरात महिला भाविकांसोबत कोणताही भेदभाव होत नाही, असा काही जण करीत असलेला दावा चुकीचा आहे. विशिष्ट वयोगटातील महिलांनी आय्यप्पा मंदिरात जाण्यास जोरदार विरोध सुरू आहे. मी मंदिरात शनिवारी देवदर्शन घेणार आहे.