कोविंद यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 04:00 AM2017-07-21T04:00:55+5:302017-07-21T04:00:55+5:30

राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल रामनाथ कोविंद यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अभिनंदन केले आणि मतदारांतून व्यापक पाठिंबा मिळवल्याबद्दल

Giving congratulations to Kovind | कोविंद यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

कोविंद यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल रामनाथ कोविंद यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अभिनंदन केले आणि मतदारांतून व्यापक पाठिंबा मिळवल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मोदी यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर लगेचच टिष्ट्वटरवर म्हटले आहे की, रामनाथ कोविंदजी, तुमचे राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन. फलदायी आणि प्रेरणादायी कारकिर्दीबद्दल शुभेच्छा. अन्य एका व्टिटमध्ये मोदी म्हणतात की, संसद आणि विविध पक्षातून कोविंद यांना जे समर्थन मिळाले त्यामुळे मी आनंदित आहे. या सदस्यांचे मी आभार व्यक्त करतो.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी कोविंद यांच्याशी संपर्क साधून त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
भाजपाचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, कोविंद यांची राष्ट्रपतीपदी निवड ही ऐतिहासिक घटना असून हा गरीब, पीडित, शोषित, वंचित व आशाआकांक्षांचा विजय आहे. टिष्ट्वटरवर शाह यांनी कोविंद हे देशाचे वैशिष्ट्यूपूर्ण आणि अपवादात्मक राष्ट्रपती असल्याचे सिद्ध करतील असा आत्मविश्वास आहे, असे म्हटले.
बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनीही नियोजित राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे अभिनंदन केले. नितीश कुमार यांनी कोविंद यांच्याशी
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोविंद यांचे टिष्ट्वटरवर विजयाबद्दल अभिनंदन केले.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी नव निर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे
की, कोविंद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वात भारत
जगाच्या नकाशावर नव्या
उंचीवर पोहचेल असा विश्वास आहे. कोविंद यांचा व्यापक
राजकीय, प्रशासकीय अनुभव सर्वांसाठीच प्रेरणास्त्रोत असणार आहे.

ग्रामीण जनतेचा सन्मान वाढला
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोविंद यांना शुभेच्छा देताना म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सकारात्मक विचारामुळे एक असे व्यक्ती राष्ट्रपतीपदी निवडले गेले आहेत ज्यांचा सार्वजनिक जीवनातील दीर्घ अनुभव तर आहेच पण, ग्रामीण भागाशीही त्यांचा जवळचा संबंध आहे.

उपेक्षितांचे सशक्तीकरण
काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी कोविंद यांचा विजय देशाच्या इतिहासातील मैलाचा दगड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांची निवड म्हणजे उपेक्षितांचे सशक्तीकरण आहे, असे त्या म्हणाल्या.

अण्णाद्रमुकच्या शुभेच्छा
अण्णाद्रमुकच्या दोन्ही गटांनी कोविंद यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी म्हटले आहे की, तामिळनाडूच्या नागरिकांच्या वतीने मी कोविंद यांना ऐतिहासिक कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो. ओ. पनीरसेल्वम यांनी म्हटले आहे की, भारताचे प्रथम नागरिक म्हणून निवड झाल्याबद्दल कोविंद यांचे अभिनंदन.

स्वकर्तृत्वावर पुढे
आलेले नेतृत्व : बादल
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी कोविंद यांना शुभेच्छा देताना म्हटले आहे की, कोविंद हे स्वत:च्या कर्तृत्वावर पुढे आलेले नेतृत्व आहे. शेतकऱ्याच्या एका मुलाला उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांचेही
कौतुक केले.

Web Title: Giving congratulations to Kovind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.