आता कोरोनासाठी नेझल स्प्रे, जाणून घ्या कोण वापरु शकतं? आणि कसा वापरायचा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 04:14 PM2022-07-15T16:14:23+5:302022-07-15T16:14:32+5:30

कॅनडामधील औषध कंपनी ‘सॅनोटाईझ’सोबत (SaNOtize) मिळून या स्प्रेची निर्मिती करण्यात आली आहे. ग्लेनमार्क नायट्रिक ऑक्साईड नेझल स्प्रे (NONS) असं नाव असणाऱ्या या औषधाला भारतात ‘फॅबीस्प्रे’ (FabiSpray) या नावाने लाँच करण्यात आलं आहे.

Glenmark nasal spray cuts down viral load of Covid by 94% in 24 hrs Glenmark had conducte | आता कोरोनासाठी नेझल स्प्रे, जाणून घ्या कोण वापरु शकतं? आणि कसा वापरायचा?

आता कोरोनासाठी नेझल स्प्रे, जाणून घ्या कोण वापरु शकतं? आणि कसा वापरायचा?

Next

मुंबईतील औषध निर्मिती करणारी कंपनी ग्लेनमार्कने (Glenmark) देशातील कोरोनासाठीचा पहिला नेझल स्प्रे लाँच केला आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या स्प्रेसाठी (India’s first Covid Nasal Spray) सरकारकडून परवानगी घेण्यात आली होती. यानंतर आता हा स्प्रे लाँच झाला आहे. कॅनडामधील औषध कंपनी ‘सॅनोटाईझ’सोबत (SaNOtize) मिळून या स्प्रेची निर्मिती करण्यात आली आहे. ग्लेनमार्क नायट्रिक ऑक्साईड नेझल स्प्रे (NONS) असं नाव असणाऱ्या या औषधाला भारतात ‘फॅबीस्प्रे’ (FabiSpray) या नावाने लाँच करण्यात आलं आहे.

‘दी लँसेट रिजनल हेल्थ साउथ-ईस्ट एशिया’ या हेल्थ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमध्ये या नेझल स्प्रेचा (FabiSpray effectiveness) किती फायदा झाला याबाबत माहिती दिली आहे. भारतात तिसऱ्या टप्प्यातील चाचणीवेळी कोरोनाच्या अतिगंभीर रुग्णांना फॅबीस्प्रे नेजल स्प्रे देण्यात आला. यानंतर 24 तासांमध्ये रुग्णांमधील व्हायरल लोड 94 टक्के कमी झालेला पाहायला मिळाला. तर, 48 तासांमध्ये विषाणूचा प्रभाव 99 टक्क्यांपर्यंत कमी झाला होता. देशातील कोरोना लस घेतलेल्या आणि न घेतलेल्या अशा एकूण 306 वयोवृद्ध व्यक्तींवर या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या अँटी-कोविड स्प्रेची (Anti-Covid Nasal Spray) चाचणी करण्यात आली होती.

ग्लेनमार्क कंपनीतील क्लिनिकल डेव्हलपमेंट विभागाच्या प्रमुख आणि सीनिअर व्हॉईस प्रेसिडेंट डॉ. मोनिका टंडन यांनी सांगितलं की, भारतात फॅबीस्प्रेची किंमत (FabiSpray price in India) 850 रुपये असेल. ही किंमत 25 मिली. बाटलीची असणार आहे. बाकी देशांच्या तुलनेत भारतात ही किंमत बरीच कमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या आठवड्यापासूनच फॅबीस्प्रे मेडिकलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल असंही त्यांनी सांगितलं. डॉ. टंडन म्हणाल्या, की सध्या केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच हा स्प्रे घेता येणार आहे. हा स्प्रे केवळ ज्येष्ठ कोरोना रुग्णांसाठी आहे. त्यामुळे इतर सामान्य औषधांप्रमाणे कोणीही याला थेट मेडिकलमधून घेऊ शकत नाही. त्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक आहे.

या स्प्रेची चाचणी देशातील 20 रुग्णालयांमध्ये असणाऱ्या कोरोना रुग्णांवर करण्यात आली. यावेळी लस घेतलेले सौम्य लक्षणं असणारे रुग्ण, आणि कोरोना प्रतिबंधात्मक लस न घेतलेले रुग्ण यांना वेगवेगळ्या गटांत ठेवण्यात आलं होतं. ग्रुपमधील निम्म्या रुग्णांना हे औषध देण्यात आलं, तर निम्म्या रुग्णांना प्लासिबो देण्यात आलं. यानंतर सात दिवसांनी एकूण निकाल पाहिला गेला. ज्या रुग्णांना नेझल स्प्रे दिला होता, त्यांमध्ये 24 तासांच्या आत कोरोना विषाणूचा प्रभाव 94 टक्क्यांनी कमी झाल्याचं पहायला मिळालं. डॉ. टंडन यांनी याबाबत माहिती दिली.

Web Title: Glenmark nasal spray cuts down viral load of Covid by 94% in 24 hrs Glenmark had conducte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.