CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनाने आतापर्यंत जगभरात घेतला 7.5 लाख लोकांचा बळी, भारत चौथ्या क्रमांकावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 11:20 PM2020-08-13T23:20:26+5:302020-08-13T23:25:32+5:30

सध्या संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर आहेत. जगभरात रोजच्या रोज समोर येणाऱ्या रुग्णांचा विचार करता भारतातून सर्वाधिक रुग्ण समोर येत आहेत. संसर्गाच्या वेगाबरोबरच देशातील मरणारांचा आकडाही वेगाने वाढत आहे.

Global coronavirus deaths cross 7.5 lakh india among the four worst hit countries | CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनाने आतापर्यंत जगभरात घेतला 7.5 लाख लोकांचा बळी, भारत चौथ्या क्रमांकावर!

CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनाने आतापर्यंत जगभरात घेतला 7.5 लाख लोकांचा बळी, भारत चौथ्या क्रमांकावर!

Next
ठळक मुद्देजगभरात रोजच्या रोज समोर येणाऱ्या रुग्णांचा विचार करता भारतातून सर्वाधिक रुग्ण समोर येत आहेत. भारतात आतापर्यंत तब्बल 47,033 हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.अमेरिकेत आतापर्यंत जवळपास 2 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मृतांच्या बाबतीत भारत आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतात आतापर्यंत तब्बल 47,033 हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

या क्रमवारीत महासत्ता अेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत जवळपास 2 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे. येथे आतापर्यंत तब्बल 1,04,201 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तीसऱ्या क्रमांकावर मॅक्सिको आहे. येथे आतापर्यंत 54,666 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतापूर्वी चौथ्या क्रमांकावर इंग्लंड होता. तेथे कोरोनामुळे 46,628 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

सध्या संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर आहेत. जगभरात रोजच्या रोज समोर येणाऱ्या रुग्णांचा विचार करता भारतातून सर्वाधिक रुग्ण समोर येत आहेत. संसर्गाच्या वेगाबरोबरच देशातील मरणारांचा आकडाही वेगाने वाढत आहे.

गेल्या 24 तासांत जगभरात 2 लाख 93 हजारहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. तर 7600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संक्रमितांची संख्या आणि मृतांच्या बाबतीत अमेरिका अजूनही पहिल्याच क्रमांकावर आहे. आज आलेल्या आकडेवारीनुसार जगभरातील मृतांचा आकडा 7.50 लाख वर पोहोचला आहे.

ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर -
कोरोनाने अमेरिकेनंतर सर्वाधिक हाहाकार ब्राझीलमध्ये घातला आहे. येथे आतापर्यंत तब्बल 31 लाख 70 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या 24 तासांत येथे तब्बल 58 हजार 81 नवे रुग्ण समोर आले आहेत.

चौथा क्रमांक भारताचा - 
कोरोनामुळे झालेल्या सर्वाधिक मृत्यूंच्या यादीत आता भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतात आतापर्यंत 23 लाख 95 हजार 471 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यांपैकी 47,033 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक गोष्ट ही, की भारतातील रिकव्हरी रेट जगाच्या तुलने फार अधिक आहे. भारतात आतापर्यंत तब्बल 16 लाख 95 हजार 860 लोक कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत.

WHO ने जारी केले एका आठवड्याचे आकडे - 
भारतात 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंत एकूण 4,11,379 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर याच काळात 6,251 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत या काळात 3,69,575 नवे रुग्ण समोर आले तर 7,232 जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ, अजित पवार नाराज? जयंत पाटलांनी केला मोठा खुलासा

पंतप्रधान मोदींनी वाजपेयींचा विक्रम मोडला, ठरले सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान

Gold Price : येणाऱ्या काळात आणखी स्वस्त होणार सोनं! विकत घेण्यापूर्वी अवश्य वाचा ही बातमी

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVirus vaccine News: फक्त 18 ते 60 वर्षांच्या आतील लोकांनाच दिली जाणार रशियन कोरोना लस, हे आहे मोठं कारण

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा

Web Title: Global coronavirus deaths cross 7.5 lakh india among the four worst hit countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.