ग्लोबल फायरपॉवर इंडेक्सची यादी जाहीर, पाकिस्तानला मोठा झटका, भारताचा रँक कितवा? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 11:43 IST2025-02-03T11:40:24+5:302025-02-03T11:43:29+5:30

भारतचा पॉवर रँक काय? पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

global firepower index ranking pakistan slips to 12th place know about the indias ranking US On the top | ग्लोबल फायरपॉवर इंडेक्सची यादी जाहीर, पाकिस्तानला मोठा झटका, भारताचा रँक कितवा? जाणून घ्या

ग्लोबल फायरपॉवर इंडेक्सची यादी जाहीर, पाकिस्तानला मोठा झटका, भारताचा रँक कितवा? जाणून घ्या

देशांच्या सैन्य शक्तीच्या आधारे त्यांची रँकिंग ठरवणारी संस्था ग्लोबल फायरपॉवरने 2025 साठी एक नवी यादी जारी केली आहे. या यादीत जगभरातील सर्व देशांचे रँकिंग निश्चित केले जाते. माात्र या वेळच्या रँकिंगमध्ये पाकिस्तानला झटका बसला आहे.

भारतचा पॉवर रँक काय? पाकिस्तान कितव्या क्रमांकावर? -
ग्लोबल फायरपॉवरच्या 2024 च्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर होता. ही रँकिंग भारताने कायम ठेवली असून 2025 च्या यादीतही भारत चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र, पाकिस्तानची स्थिती पूर्वीच्या तुलनेत प्रचंड खराब झाली आहे. पाकिस्तान 2024 च्या यादीत जगातील पॉवरफूल देशांमध्ये 9व्या स्थानावर होता. जो 2025 मध्ये घसरून 12व्या क्रमांकावर गेला आहे. तसेच या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर रशिया तर तिसऱ्या क्रमांकावर चीन आहे.

2025 च्या टॉप-10 पॉवरफूल देशांची यादी अशी - 
अमेरिका - आपली आत्याधुनिक क्षमता, आर्थिक ताकद, जागतिक प्रभाव यांमुळे अमेरिका सर्वोच्च स्थानावर बसलेली आहे. तिचा पॉवर इंडेक्स स्कोर 0.0744 एवढा आहे.

रशिया - युक्रेनसोबत युद्ध सुरू असतानाही, ईरान, उत्तर कोरिया आणि चीन सोबतच्या रणनीतिक संबंधांमुळे रशिया मजबूत स्थितीत आहे. रशियाचा पॉवर इंडेक्स स्कोर 0.0788 एवढा आहे.

चीन - संरक्षण आणि तांत्रिक गुंतवणूकीत मोठी वाढ केल्याने चीन टॉप 3 मध्ये आहे. चीनचा पॉवर इंडेक्स स्कोर 0.0788 आहे.

भारत - प्रगत लष्करी उपकरणे, आधुनिक शस्त्रे आणि राणनीतिक स्थितीमुळे भारताच्या लष्करी क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. भारताचा पॉवर इंडेक्स स्कोअर 0.1184 एढा आहे.

दक्षिण कोरिया - संरक्षण क्षेत्रातील मोठी गुंतवणूक आणि जागतिक भागीदारी, यांमुळे दक्षिण कोरियाचा समावेश टॉप-५ देशांमध्ये होतो. त्यांचा पॉवर इंडेक्स ०.१६५६ आहे.

यानंतर, यूके (पॉवर इंडेक्स स्कोर 0.1785), फ्रान्स (पॉवर इंडेक्स स्कोर 0.1878), जपान (पॉवर इंडेक्स स्कोअर ०.१८३९), टर्की (पॉवर इंडेक्स स्कोअर ०.१९०२), इटली (पॉवर इंडेक्स स्कोअर ०.२१६४) 

Web Title: global firepower index ranking pakistan slips to 12th place know about the indias ranking US On the top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.