जागतिक संकेतांनी घटली सोन्याची खरेदी
By admin | Published: November 28, 2014 12:09 AM2014-11-28T00:09:42+5:302014-11-28T00:09:42+5:30
जागतिक संकेतांच्या पाश्र्वभूमीवर गुरुवारी सलग तिस:या दिवशी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली आहे.
Next
नवी दिल्ली : जागतिक संकेतांच्या पाश्र्वभूमीवर गुरुवारी सलग तिस:या दिवशी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली आहे. स्टॉकिस्टच्या मागणीअभावी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात आज सोन्याचा भाव 1क्क् रुपयांच्या घसरणीसह 26,78क् रुपये प्रति 1क् ग्रॅम झाला. औद्योगिक संस्थांच्या उठावाअभावी चांदीचा भाव 45क् रुपयांनी घटून 36,75क् रुपये प्रतिकिलो राहिला.
व्यापा:यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील घसरणीच्या पाश्र्वभूमीवर स्टॉकिस्टनी सध्याच्या पातळीवर विक्रीचा मारा केल्याने सोन्याच्या भावात घट नोंदली गेली आहे. जागतिक बाजारात सोन्याचा भाव नीचांकी पातळीवर गेला आहे. याचा स्थानिक बाजार धारणोवर नकारात्मक परिणाम झाला.
देशी बाजाराचा कल निश्चित करणा:या सिंगापुरात सोन्याचा भाव एक टक्क्याच्या घसरणीसह 1,185.82 डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भाव 2.1 टक्क्याने घटून 16.16 डॉलर प्रतिऔंस झाला. गेल्या 14 नोव्हेंबरनंतरची ही नीचांकी पातळी आहे. दिल्ली बाजारातच 99.9 व 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 1क्क् रुपयांनी घटून अनुक्रमे 26,78क् रुपये आणि 26,58क् प्रति 1क् ग्रॅम झाला. मर्यादित व्यवहारामुळे आठ गॅ्रम गिन्नीचा भाव 23,8क्क् रुपयांवर कायम राहिला.
तयार चांदीचा भाव 45क् रुपयांनी कमी होऊन 6,75क् रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव 56क् रुपयांच्या घसरणीसह 36,क्6क् रुपये प्रतिशेकडा झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव 1,क्क्क् रुपयांनी घटून खरेदीसाठी 62,क्क्क् रुपये व विक्रीकरिता 63,क्क्क् रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)