ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्ण वर्षांच्या नोंदीत वाढ; देशभरात १ हजार ५६२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 01:37 AM2020-01-12T01:37:14+5:302020-01-12T06:43:32+5:30

२०१९ या वर्षाची सातवे उष्ण वर्ष म्हणून नोंद

Global warming increases warmer summer records; 5 thousand 5 deaths across the country | ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्ण वर्षांच्या नोंदीत वाढ; देशभरात १ हजार ५६२ जणांचा मृत्यू

ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्ण वर्षांच्या नोंदीत वाढ; देशभरात १ हजार ५६२ जणांचा मृत्यू

Next

मुंबई : जागतिक तापमानवाढीचा धोका दिवसागणिक वाढतच असून, वेगाने बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून नैसर्गिक आपत्तीही ओढविण्याचे प्रमाण वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे उष्ण वर्षांच्या नोंदीही वाढतच असून, २०१९ या वर्षाची सातवे उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली असतानाच या वर्षात घडलेल्या आपत्कालीन घटनांत महाराष्ट्रात २३१ जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्दैव म्हणजे आपत्कालीन दुर्घटनांमुळे राष्ट्रीय स्तरावरील मनुष्यहानीचा विचार करता अशा दुर्घटनांत १ हजार ५६२ जणांचा मृत्यू झाला आहे.

भारत सरकारचे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय व भारतीय हवामान शास्त्र विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, २ जुलै ते २६ सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रात आलेल्या महापुरासह मुसळधार पावसामुळे १३६ जणांचा मृत्यू झाला. २० मार्च ते ३० ऑक्टोबर या कालावधीत
वीज कोसळून झालेल्या दुर्घटनांत ५१ जणांचा मृत्यू झाला. २ एप्रिल ते ९ जून या कालावधीत आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे ४४ जणांचा
मृत्यू झाला. आपत्कालीन घटनांमध्ये प्रामुख्याने हिमस्खलन, महापूर, मुसळधार पाऊस, वादळे, वीज कोसळणे, उष्णतेच्या लाटांसह शीत लहरीसारख्या घटनांचा समावेश आहे.

२०१९ साली घडलेल्या आपत्कालीन घटना आणि मनुष्यहानी
जम्मू-काश्मीरमध्ये हिमस्खलनामुळे ३३ जणांचा मृत्यू,  राजस्थानमध्ये महापुरासह मुसळधार पावसामुळे ८० तर वादळामुळे १४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशात वीज कोसळून २४ जणांचा मृत्यू, कर्नाटकात महापुरामुळे ४३ जणांचा मृत्यू, केरळमध्ये महापुरामुळे ८६ जणांचा मृत्यू
लेहमध्ये हिमस्खलनामुळे १८ जणांचा मृत्यू, हिमाचल प्रदेशात महापुरामुळे २७ जणांचा मृत्यू, उत्तर प्रदेशात महापुरामुळे १०७ तर शीत लहरीमुळे २८ जणांचा मृत्यू, बिहारमध्ये आलेल्या महापुराने ३०६, तर वादळामुळे ७१ जणांचा आणि उष्णतेच्या लाटेने २९२ जणांचा मृत्यू
झारखंडमध्ये वादळाने १२५ तर उष्णतेच्या लाटेने १३ जणांचा मृत्यू ओडिशामध्ये महापुरामुळे ६४ जणांचा मृत्यू

Web Title: Global warming increases warmer summer records; 5 thousand 5 deaths across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.