गो एअरच्या कर्मचाऱ्यांना विनावेतन सुटीवर जाण्याचे आदेश, कंपनीने दिले असे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 02:42 PM2020-03-18T14:42:06+5:302020-03-18T14:47:36+5:30
कोरोना व्हायरसमुळे उड्डानांची संख्या कमी झाल्याने कंपनीने कर्मचाऱ्यांना सुट्टीवर जाण्याचा आदेश दिला आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना काम करण्याच्या जागेपासून दूर ठेवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे कंपनीने म्हटले आहे.
नवी दिल्ली - जगभरात हाहाकार घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा फटका आता विमान कर्मचाऱ्यांनाही बसायला सुरूनात झाली आहे. स्वस्त उड्डाणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गो एअर या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना रोटेशनप्रमाणे विना वेतन सुट्टीवर जाण्याचे आदेश दिले आहेत.
देशभरात कोरोना व्हायरची लागण होणाऱ्या नागरिकांमध्ये सात्त्याने वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 147वर पोहोचली आहे. कोरोनामुळे देशात तीन जणांचा मृत्यू झाल आहे. सेंट्रल रेल्वेनेही 31 मार्च पर्यंत 22 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. याशिवाय आता गो एअरनेही आपली सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाने रद्द केली आहेत.
कोरोना व्हायरसमुळे उड्डानांची संख्या कमी झाल्याने कंपनीने कर्मचाऱ्यांना सुट्टीवर जाण्याचा आदेश दिला आहे. 15 एप्रिलपर्यंत गो एअरची आंतरराष्ट्रीय उड्डाने रद्द राहतील. असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना काम करण्याच्या जागेपासून दूर ठेवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कोरोनाचा परिणाम रक्तपेढ्यांवरही -
उपराजधानीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), डागा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यासह रुग्णांना अत्यधुनिक आणि दर्जेदार सुविधा देणारी ६३३ वर खासगी रुग्णालये आहेत. यामुळे विदर्भच नाही तर छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा येथून रुग्णांचा ओढा नागपूरकडे वाढला आहे. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळंतपणाच्या रुग्णांची संख्या अधिक असते. यांना रक्तपुरवठा करणाऱ्या चार शासकीय आणि नऊ खासगी रक्तपेढ्या आहेत. परंतु शासनातर्फे शाळा-महाविद्यालयांना सुटी, मेळावे-कार्यक्रमावर बंदी व घरातून बाहेर पडू नये असे आवाहन केले जात असल्याने याचा प्रभाव रक्तदानावर झाला आहे. शिवाय, काही रक्तदात्यांमध्ये कोरोनाची भीती किंवा संभ्रम निर्माण झाल्याने स्वेच्छा रक्तदानही फार कमी झाले आहे. शासकीयसह खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्तपिशव्यांचा अपुरा साठा आहे. यावर उपाय म्हणून राज्य रक्त संक्रमण परिषदेने आवश्यक सूचना जारी केल्या आहेत.
रेल्वे विभागालाही फटका -
गेल्या पाच दिवसांमध्ये तिकीट आरक्षण ५० टक्क्यांनी कमी झाले असून, प्रवाशांची संख्या १५ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे स्थानक परिसरात शुकशुकाट पसरला आहे. दक्षता म्हणून विविध रेल्वेच्या डब्यांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण रोज करण्यात येत आहे.