घटस्फोट घेणाऱ्या दाम्पत्याला न्यायाधिशांनी दिलं ऋतिक-सुजैनचं उदाहरण, मनात कटूता न ठेवण्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 11:04 AM2017-11-01T11:04:37+5:302017-11-01T11:08:27+5:30
पंजाबच्या पठाणकोटमधील कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोट घेणाऱ्या एका दाम्पत्याला मनातील कटूता विसरण्याचा सल्ला दिला.
चंदीगड- पंजाबच्या पठाणकोटमधील कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोट घेणाऱ्या एका दाम्पत्याला मनातील कटूता विसरण्याचा सल्ला दिला. त्यासाठी न्यायालयाने त्यांना अभिनेता ऋतिक रोशन आणि सुजैन खान यांच्या नात्याचं, तसंच गौरी लंकेश यांचं उदाहरण दिलं. घटस्फोट घेतल्यानंतरही अभिनेत्रा ऋतिकचे त्याच्या पत्नीबरोबर मैत्रीचे संबंझ आहेत तसंच पत्रकार गौरी लंकेश यांचेही त्यांच्या पतीशी घटस्फोटानंतर मैत्रीपूर्ण संबंध होते, असं न्यायालयाने त्या दाम्पत्याला सांगितलं.
कौटुंबिक न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधिश रमेश कुमारी यांनी हा सल्ला दिला आहे. सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल अनिल काबोत्रा यांनी पठाणकोटच्या कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. त्यांचा अर्ज न्यायाधिश रमेश कुमारी यांनी स्वीकारला. घटस्फोटानंतरही पती-पत्नीमध्ये मैत्रीपूर्व संबंध राहू शकता. हे अधोरेखीत करणारी अनेक उदाहरणं या दुनियेत आहेत. अभिनेता ऋतिक रोशन आणि त्याची पत्नी सुजैन या दोघांमध्ये घटस्फोटानंतर मैत्रीचं नातं आहे. पत्रकार गौरी लंकेश यांचेही त्यांच्या पतीबरोबर घटस्फोटानंतर चांगलं नातं होतं, असं घटस्फोटाचा अर्ज स्विकारताना रमेश कुमारी यांनी म्हंटलं.
2015मध्ये 70 वर्षीय लेफ्टनंट कर्नलने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या पत्नीचं वय 60 वर्ष आहे. पत्नीवर असलेल्या खोट्या प्रकरणामुळे पतीला मानसिक आणि शारीरिक यातना सहन कराव्या लागल्या. कोर्टाने त्यांना क्रुरतेच्या आधारावर घटस्फोट घेण्याचा अधिकार दिला आहे. तसंच या प्रकरणावर गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत कोर्टाने पत्नीने पोटगीसाठी केलेला अर्ज फेटाळला.