गो इंडिगोचे विमान लँड झाले अन् पाकिस्तानमधून फोन आला...'शब्द दिलेला, ईद मुबारक'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 10:24 AM2019-06-05T10:24:54+5:302019-06-05T10:27:26+5:30

पाकिस्तानने अहमदाबादजवळील टेलेम एंट्री पॉइंट खुला केला होता.

Go Indigo's plane landed and a phone from Pakistan came ... 'given the word' Eid Mubarak' | गो इंडिगोचे विमान लँड झाले अन् पाकिस्तानमधून फोन आला...'शब्द दिलेला, ईद मुबारक'

गो इंडिगोचे विमान लँड झाले अन् पाकिस्तानमधून फोन आला...'शब्द दिलेला, ईद मुबारक'

Next

नवी दिल्ली : बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने हवाई क्षेत्र विमानोड्डानांसाठी बंद केले होते. तीन महिन्यांनी ही बंदी उठविली असून दोन्ही देशांदरम्यान विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी गो इंडिगोचे दुबई - दिल्ली विमान सुखरूप पाकिस्तानमार्गेभारतात पोहोचले. यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्याने फोनवर 'शब्द दिलेला, ईद मुबारक', असे सांगत हवाई क्षेत्र भारतीय विमानांसाठी खुले झाल्याचा संदेश दिला. 


पाकिस्तानने अहमदाबादजवळील टेलेम एंट्री पॉइंट खुला केला होता. पाकिस्तानकडून फोन करणार अधिकारी दुसरा तिसरा कोणी नसून पाकिस्तानी सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटी (CAA) चे संचालक होते. त्यांनी इंडिगोच्या अधिकाऱ्याला फोन करून, 'तुम्ही अजून जागे आहात का' असे विचारले. यानंतर ''मी फ्लाईट निरिक्षण करत आहे. विमान यशस्वीरित्या दिल्लीला उतरले आहे. तुम्हाला शब्द दिलेला. ईद मुबारक'', असा संदेश दिला. 


पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या बालाकोट एअर स्ट्राईकच्या दुसऱ्या दिवशीच पाकिस्तानने 11 एन्ट्री पॉईंट बंद केले होते. या पॉईंटवरून भारतीय विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीमध्ये प्रवेश करत होत्या.यामुळे दक्षिण आशिया आणि पाश्चिमात्या देशांकडे जाण्यासाठी विमानांना वळसा घालून जावे लागत होते. तीन महिन्यांनंतर पाकिस्तानने पहिला टेलेम पॉईंट खुला केला. या मार्गावरून विमान भारतात पोहोचले. हा मार्ग खुला झाल्यानंतर सर्वप्रथम ऐतिहादच्या विमानाने रविवारी संध्याकाळी 5.34 वाजता अबुधाबी-दिल्ली उड्डाण केले. 

इंडिगोच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानने सुचविले होते की, टेलेमच्या मार्गाने विमाने उडविण्यापूर्वी एक चाचणी घेऊ. याद्वारे एका विमानाला त्या मार्गे पाठवा. यानुसार दुबई - दिल्ली फ्लाईट (6E-24) ला या मार्गे जाण्य़ाची योजना बनविण्यात आली. 

इंडिगोने तरीही विमानात जास्तीचे इंधन ठेवलेले
भारत-पाकिस्तान दरम्यानचा तनाव पाहता इंडिगोने विमानामध्ये जास्त इंधन ठेवले होते. जर वळसा मारायला लागला तर कमी इंधन पुरेसे ठरणार नव्हते. यामुळे सावधगिरी बाळगण्यात आली होती. 


Web Title: Go Indigo's plane landed and a phone from Pakistan came ... 'given the word' Eid Mubarak'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.