वंदे भारतमधून आता बसून नव्हे झोपून जा; प्रवासात गरम पाण्याचा शाॅवरही घ्या, लवकरच हाेणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 02:03 PM2024-09-02T14:03:46+5:302024-09-02T14:04:02+5:30

Vande Bharat Express: देशातील पहिली सेमी हायस्पीड वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार झाली असून तीन महिन्यांमध्ये ती प्रवाशांच्या सेवेत सादर हाेणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्लीपर ‘वंदे भारत’च्या पहिल्या माॅडेलची झलक दाखविली. 

Go through Vande Bharat now not sitting but sleeping; Take a hot shower while traveling | वंदे भारतमधून आता बसून नव्हे झोपून जा; प्रवासात गरम पाण्याचा शाॅवरही घ्या, लवकरच हाेणार लाँच

वंदे भारतमधून आता बसून नव्हे झोपून जा; प्रवासात गरम पाण्याचा शाॅवरही घ्या, लवकरच हाेणार लाँच

बंगळुरू : देशातील पहिली सेमी हायस्पीड वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार झाली असून तीन महिन्यांमध्ये ती प्रवाशांच्या सेवेत सादर हाेणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्लीपर ‘वंदे भारत’च्या पहिल्या माॅडेलची झलक दाखविली. 

बंगळुरुच्या बीईएमएल कारखान्यात ही ट्रेन तयार करण्यात आली असून वैष्णव यांनी नव्या रेल्वेची पाहणी केली. झाली असून काही दिवसांमध्ये ती कारखान्यातून बाहेर आणली जाईल. सुरुवातीला १० दिवस गाडीची कठाेर अंतर्गत चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर दाेन महिने या गाडीची रूळांवर चाचणी करण्यात येईल. त्यानंतर ही गाडी लाॅंच करण्यात  येणार आहे.

- ८००-१,२०० किलाेमीटर अंतरावरील प्रवासासाठी ‘स्लीपर वंदे भारत’ तयार केली आहे.
- रात्री १० वाजण्याच्या आसपास प्रवासी ट्रेनमध्ये बसतील आणि सकाळी गंतव्यस्थळी पाेहाेचेल.
- मध्यमवर्गीयांना विचारात घेऊन गाडी बनविली असून राजधानी एक्स्प्रेसएवढे भाडे राहील. 

काय आहे या नव्या गाडीत खास...
nनव्या गाडीत संतुलन आणि स्थिरतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. 
nत्यामुळे ट्रेनच्या आत आवाज कमी येईल.
nनवीन कपलर तंत्रज्ञानामुळे ट्रेनचे वजन कमी आणि मजबुती वाढते. 
nट्रेनचे डबे आणि शाैचालय अपग्रेड करण्यात आले आहे. 
nयाशिवाय ट्रेनमध्ये अनेक नवे सुरक्षा फिचर्स देण्यात आले आहेत.
nदेखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन बनविली आहे. 

अशी असेल गाडीची रचना
n१६ डब्यांची असेल स्लीपर वंदे भारत
n१ एसी प्रथम श्रेणी - २४ बर्थ
n४ एसी द्वितीय श्रेणी - १८८ बर्थ
n११ एसी तृतीय श्रेणी - ६११ बर्थ
nताशी १८० किमी सर्वाेच्च वेग
nताशी १६० किमी कमाल वेग मर्यादा
nराजधानी एक्स्प्रेसपेक्षा वेगवान प्रवास 

या आहेत सुविधा
nसीटवर यूएसबी चार्जिंग, रिडिंग लाईटची साेय.
nमाॅड्युलर पॅन्ट्री, डिस्प्ले पॅनल आणि सीसीटीव्ही.
nएसी प्रथम श्रेणीच्या डब्यात गरम पाण्याचा शाॅवर.
nवरच्या बर्थवर जाण्यासाठी पायऱ्यांची नवी रचना.
nसामान ठेवण्यासाठी जास्त जागा.
nदिव्यांग प्रवाशांसाठी वेगळा विशेष बर्थ असेल.
nऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवणारी यंत्रणा.
nलाेकाे पायलटसाठी शाैचालय
nकमी झटके बसणार.

 

Web Title: Go through Vande Bharat now not sitting but sleeping; Take a hot shower while traveling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.