Goa Assembly Election Results 2022: उत्पल पर्रीकरांनी बिघडवला भाजपचा खेळ, पोस्टल मतपत्रिकेत पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 10:35 AM2022-03-10T10:35:44+5:302022-03-10T10:36:18+5:30

Goa Assembly Election Results 2022: गोव्यात भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचा मुलगा अपक्ष म्हणून रिंगणात असून भाजपचा खेळ बिघडवताना दिसत आहे. उत्पल सध्या ट्रेंडमध्ये आघाडीवर आहेत.

Goa Assembly Election Results 2022: Utpal Parrikar spoils BJP's game, continues in postal ballot | Goa Assembly Election Results 2022: उत्पल पर्रीकरांनी बिघडवला भाजपचा खेळ, पोस्टल मतपत्रिकेत पुढे

Goa Assembly Election Results 2022: उत्पल पर्रीकरांनी बिघडवला भाजपचा खेळ, पोस्टल मतपत्रिकेत पुढे

Next

पणजी: गोवा विधानसभेच्या (Goa Assembly election result 2022) सर्व 40 जागांचे निकाल काही तासांतच समोर येणार आहेत. सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत भाजप 18 जागांवर तर काँग्रेस 17 जागांवर आघाडीवर आहे. एकूणच येथे काट्याची टक्कर आहे. दुसरीकडे, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar)  हे पोस्टल मतपत्रिकांच्या मतमोजणीत आघाडीवर आहेत.

उत्पल पर्रीकर हे अपक्ष उमेदवार आहेत
भाजपवरील नाराजीमुळे उत्पल पर्रीकर अपक्ष उमेदवार म्हणून पणजीतून रिंगणात आहेत. माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांनी या जागेवरून भाजपकडे तिकीट मागितले होते, मात्र भाजपने त्यांना येथून तिकीट दिले नाही. यानंतर उत्पल यांनी बंड करून पणजीतून अपक्ष म्हणून फॉर्म भरला आणि आता ते भाजपचे उमेदवार अतानासिओ मोन्सेरात आणि काँग्रेसचे एल्विस गोम्स यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत.

या नेत्यांचे भविष्य पणाला 
मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत (भाजप), विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (काँग्रेस), माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाओ (टीएमसी), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांची विश्वासार्हताही धोक्यात आली आहे. त्यामुळे या मोठ्या नेत्यांच्या भविष्याबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. पण, अजून बरीच मतमोजणी बाकी आहे, सर्व निकाल हाती आल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील.

Web Title: Goa Assembly Election Results 2022: Utpal Parrikar spoils BJP's game, continues in postal ballot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.