गोवा लाचप्रकरण सीआयडीकडे

By admin | Published: July 21, 2015 01:10 AM2015-07-21T01:10:21+5:302015-07-21T01:10:21+5:30

अमेरिकेतील लुईस बर्जर कंपनीकडून जैका प्रकल्पाचे कंत्राट मिळविण्यासाठी गोव्यातील तत्कालीन काँग्रेस सरकारमधील एका मंत्र्याला देण्यात आलेल्या ६

Goa bribery CID | गोवा लाचप्रकरण सीआयडीकडे

गोवा लाचप्रकरण सीआयडीकडे

Next

पणजी : अमेरिकेतील लुईस बर्जर कंपनीकडून जैका प्रकल्पाचे कंत्राट मिळविण्यासाठी गोव्यातील तत्कालीन काँग्रेस सरकारमधील एका मंत्र्याला देण्यात आलेल्या ६ कोटी रुपयांच्या कथित लाचप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. सीआयडीने सार्वजनिक बांधकाम खात्याकडून फाइल्स मागविल्या आहेत.
लुईस बर्जर कंपनीवरून गोव्यात राजकारण तापले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांसाठी प्राधान्यक्रमातील प्रस्तावित सल्लागार कंपन्यांमध्ये लुईस बर्जरचा समावेश कसा करण्यात आला, असा सवाल अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. लुईस बर्जर कंपनीने केवळ भारतातच नव्हे तर कुवेत, इंडोनेशिया तसेच व्हिएतनाम येथे अधिकाऱ्यांना लाच दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच कंपनीला ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांच्या प्रस्तावित सल्लागार कंपन्यांमध्ये कसे स्थान मिळू शकते, याचा खुलासा करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Goa bribery CID

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.