गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा स्विमिंग पूलमधील फोटो झाला व्हायरल
By admin | Published: February 24, 2017 04:32 PM2017-02-24T16:32:18+5:302017-02-24T17:19:48+5:30
गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दरम्यान, एका फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलमधील हा फोटो
Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 24 - गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. येथील एका फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलमधील आपला फोटो त्यांनी फेसबुक पेजवर अपलोड केला. या फोटोच्याखाली एक कॅप्शन सुद्धा दिली होती, त्यावर नेटिझन्सनी ट्रोल केल्यानंतर त्यांनी ती कॅप्शन बदलली.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी येथील एका फॉरेस्ट रिसॉर्ट स्विमिंग पूलमधील आपला फोटो फेसबुकवर अपलोड केला. तसेच, त्या फोटोखाली “Relaxing after elections. Guess who? Guess where?” अशी त्यांनी कॅप्शन लिहिली होती. दरम्यान, या त्यांच्या फोटोला अनेकांनी लाईक करत कॉमेंट केल्या. यामध्ये काही निगेटिव्ह कॉमेंट करत त्यांना ट्रोल केले. त्यांनतर त्यांनी ती कॅप्शन पुन्हा बदलली आणि “Communing with nature. A refreshing experience”. अशी लिहिली.
दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आपल्या कुटुंबीयांसोबत सध्या रिसॉर्टमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.