Goa CM pramod sawant oath ceremony Live : "हाव डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत, देवाची सोपूत घेतो की...;" गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची घेतली दुसऱ्यांदा शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 12:11 PM2022-03-28T12:11:34+5:302022-03-28T12:13:16+5:30
Goa CM pramod sawant oath ceremony Live Update : प्रमोद सावंत यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील लावली होती हजेरी.
Goa CM pramod sawant oath ceremony Live Update : भाजपचे नेते डॉ. प्रमोद सावंत यांनी दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सोमवारी सकाळी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. गोव्यातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडिअममध्ये हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रमोद सावंत यांच्या व्यतिरिक्त भाजपच्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह सात राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते.
डॉ. प्रमोद सावंत यांनी शपथविधीपूर्वी राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेत शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी सादर केली. दरम्यान, प्रमोद सावंत यांच्यासह आमदार विश्वजीत राणे, मॉविन गुदिन्हो, फोंड्याचे आमदार रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि अतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
Pramod Sawant takes oath as Goa Chief Minister for the 2nd consecutive term pic.twitter.com/eaQVS46583
— ANI (@ANI) March 28, 2022
मोदी, जेपी नड्डा सोहळ्यात सहभागी
या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह काही राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यावेळी उपस्थित होते.
PM Narendra Modi attends the oath-taking ceremony of CM-designate Pramod Sawant, at Dr. Shyama Prasad Mukherjee Stadium in Goa. pic.twitter.com/4SoEwPPj5e— ANI (@ANI) March 28, 2022
शपथविधीपूर्वी पूजा
प्रमोद सावंत यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी पूजादेखील केली. त्यांनी पूजेचे काही फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले. गोव्याच्या लोकांच्या सेवेसाठी देवाकडे प्रार्थना केल्याचं त्यांनी सांगितलं.
Offered prayers to the Almighty as we continue on our journey to serve the people of Goa. pic.twitter.com/r5SVTYpLHj— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) March 28, 2022
भाजपचा २० जागांवर विजय
गोवा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपला ४० पैकी २० जागांवर विजय मिळाला. तर काँग्रेसला ११ आणि अपक्षांना २ जागांवर विजय मिळाला. याशिवाय महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला आणि आम आदमी पक्षाला २-२ जागांवर विजय मिळाला होता. तर जीएफपी आणि आरजीपीनं एक-एक जागांवर विजय मिळावला. मगोपच्या दोन आणि तीन अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला.