भाजपा कार्यकारिणीच्या जेवणावळीवर गोवा सरकारने केली उधळपट्टी

By Admin | Published: October 22, 2015 01:21 AM2015-10-22T01:21:25+5:302015-10-22T01:21:25+5:30

भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ५४३ प्रतिनिधींना ८ जून २0१३ रोजी येथील मेरियॉट रिसॉर्टमध्ये दिलेल्या जेवणावळीवर

The Goa government made a dinner on the BJP executive dinner | भाजपा कार्यकारिणीच्या जेवणावळीवर गोवा सरकारने केली उधळपट्टी

भाजपा कार्यकारिणीच्या जेवणावळीवर गोवा सरकारने केली उधळपट्टी

googlenewsNext

पणजी : भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ५४३ प्रतिनिधींना ८ जून २0१३ रोजी येथील मेरियॉट रिसॉर्टमध्ये दिलेल्या जेवणावळीवर सरकारी तिजोरीतून ६ लाख ३७ हजार ७२१ रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आयरिश रॉड्रिग्स यांना माहिती अधिकार कायद्याखाली मिळाली आहे.
७ जून ते ९ जून काळात गोव्यात भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या माध्यम सल्लागार अधिकारी संचिता रॉड्रिग्स यांनी ४ जून रोजी शिष्टाचार खात्याला नोट पाठवून राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीसाठी जेवणासाठी खर्चमंजुरी मागितली होती. त्यात भाजपाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आला.
४८ भोजनावळी
९ मार्च २0१२ ते ८ नोव्हेंबर २0१४ या काळात मुख्यमंत्री असताना पर्रीकरांनी ४८ भोजनावळी दिल्या. त्यावर ४0 लाख ९६ हजार ३२ रुपये खर्च झाले. २१ प्रकरणांमध्ये जेवणावळीचे कारण स्पष्ट नसतानाही शिष्टाचार खात्याने बिले मंजूर केली. ९ मार्च २0१३ रोजी मेरियॉटमध्ये दिलेल्या अन्य एका जेवणावळीत ९0 जणांवर १ लाख ३७ हजार ९५0 रुपये उधळण्यात आले. २५ सप्टेंबर २0१३ रोजी हॉटेल मांडवी रिव्हिएरामध्ये ४00 जणांना दुपारी भोजन देण्यात आले. त्यावर ३ लाख ९५ हजार ६९४ रुपये खर्च करण्यात आले. उपरोक्त खर्चाबाबत जे दस्तऐवज हाती आले आहेत, ते दक्षता खात्याला सादर करून कारवाईची मागणी करणार असल्याचे आयरिश यांनी स्पष्ट केले आहे. सार्वजनिक पैशांचा हा अपव्यय असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

‘आम आदमी’चा इशारा :
आम आदमी पार्टीने या उधळपट्टीचा निषेध केला असून सात दिवसांच्या आत सरकारने हे पैसे परत करावेत. अन्यथा महालेखापालांकडे तक्रार करू, असा इशारा दिला आहे.

Web Title: The Goa government made a dinner on the BJP executive dinner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.