समुद्रामार्गे दहशतवादी घुसण्याची भीती, गोव्यात हाय अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2018 11:45 AM2018-04-07T11:45:05+5:302018-04-07T11:45:05+5:30

गोव्यातील समुद्रामार्गे दहशतवादी भारतात घुसण्याची भीती गुप्तचर संघटनेने व्यक्त केली आहे

Goa issues alert after intel on terrorists using sea route to arrive in India | समुद्रामार्गे दहशतवादी घुसण्याची भीती, गोव्यात हाय अलर्ट

समुद्रामार्गे दहशतवादी घुसण्याची भीती, गोव्यात हाय अलर्ट

Next

पणजी  - गोव्यातील समुद्रामार्गे दहशतवादी भारतात घुसण्याची भीती गुप्तचर संघटनेने व्यक्त केली आहे.  गोव्यातील समुद्र किनाऱ्यावली मच्छीमारी करणाऱ्या सर्व जहाज आणि तेथील शेतकऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच येथील भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
मच्छिमारांच्या जहाजाद्वारे दहशतवादी भारतात घुसण्याची शक्यता गुप्तचर संघटनेने व्यक्त केली आहे.  गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर अलर्ट जारी करण्यात आला असून तेथील शेतकरी, वॉटर स्पोर्ट संचालकांना आणि जहाज मालकांना सुचना दिल्या आहेत. 
गोव्याचे मंत्री जयेश साळगांवकर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, पच्छिम भागात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. याबाबद गुप्तचर संघटनेने सुचना दिल्या आहेत. गुप्तचर संघनेच्या या सुचनेनंतर गृह विभागाने समुद्र किनाऱ्यावर अलर्ट जारी केला आहे.  साळगांवकर पुढे म्हणाले की, हा अलर्ट फक्त गोवामध्येच नाही तर मुंबई किंवा गुजरात सीमाभागातही आहे. या ठिकाणीही दहशतवादी घुसण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने भारताच्या मच्छिमार बोटींना सोडलं आहे. त्या बोटीमार्ग दहशतवादी भारतात घुसण्याची शक्यता असल्याचे गुप्तचर संघटनेने सांगितले आहे. 

Web Title: Goa issues alert after intel on terrorists using sea route to arrive in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.