गोव्यातील मंत्र्यांना घरपोच पैसे ?

By admin | Published: August 3, 2015 12:13 AM2015-08-03T00:13:33+5:302015-08-03T00:13:33+5:30

Goa ministers get money from home? | गोव्यातील मंत्र्यांना घरपोच पैसे ?

गोव्यातील मंत्र्यांना घरपोच पैसे ?

Next
>लाच प्रकरण : क्राईम ब्रँचचा तपास वेगात

वासुदेव पागी
पणजी : जैका प्रकल्पात लुईस बर्जर इंटरनॅशनल कन्सल्टन्सीकडून तत्कालीन दोघा मंत्र्यांना शासकीय बंगल्यातच लाच दिली होती, अशा निष्कर्षापर्यंत तपास पोहोचला आहे.
तिघा अधिकार्‍यांचे पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यापुढे नोंदविलेले महत्त्वाचे जबाब तर्कसुसंगत आहेत. त्यावरून अनेक बाबींची स्पष्टता होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली.
जैकाचे दोन माजी अधिकारी तसेच शहा कन्सल्टन्सीचे माजी अधिकारी यांनी नोंदविलेल्या जबाबात तर्कसुसंगतता असल्याची माहिती पणजी सत्र न्यायालयात क्राईम ब्रँचतर्फे देण्यात आली होती. जैकाचे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान ही माहिती न्यायालयाला सादर करण्यात आली. विशेष सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तत्कालीन कोणत्या मंत्र्याला कोठे आणि केव्हा लाच दिली, याची सविस्तर माहिती तीन साक्षीदारांनी क्राईम ब्रँचला दिली आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांच्यावर लाच प्रकरणी याआधी आरोप झाल्याने ते संशयाच्या फेर्‍यात अडकले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Goa ministers get money from home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.