गोवा टँकरग्रस्त!
By admin | Published: May 2, 2016 12:42 AM2016-05-02T00:42:21+5:302016-05-02T00:42:21+5:30
गोव्यातही यंदा दुष्काळाच्या झळा जाणवत असून राज्यातील सुमारे ३0 ते ३५ दुर्गम गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून सार्वजनिक बांधकाम खात्याने १00 टँकर्सद्वारे पाणी
पणजी : गोव्यातही यंदा दुष्काळाच्या झळा जाणवत असून राज्यातील सुमारे ३0 ते ३५ दुर्गम गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून सार्वजनिक बांधकाम्-+ा खात्याने १00 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. केपे भागाला पाणी तुटवड्याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
केपे तालुक्यात २५ टँकर्स कार्यरत आहेत. ग्रामीण भागात महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाण्याचा दाब किंचित कमी झाला तरी डोंगराळ भागात ते चढत नाही. मार्च ते जून मध्यापर्यंत डोंगराळ भागातील गावांना पाण्याची जास्त टंचाई भासते. सांगे, काणकोण, पेडणे, सत्तरीत डोंगराळ भागांना तसेच बार्देसमधील टोकाकडील किनारी भागांतही पाण्याची समस्या जाणवू लागली आहे.
डोंगराळ भागात जाण्यासाठी व्यवस्थित रस्तेही नसल्याने लहान वाहनांचे टँकर्स वापरले जात आहेत. . वर्षाकाठी चार ते पाच कोटी रुपये खासगी टँकर्सवर खर्च केले जातात, अशी माहिती प्रधान मुख्य अभियंता दत्तात्रय बोरकर यांनी दिली. मध्यंतरी ओपा जलाशयातील पाण्याची पातळी घटल्याने तेथील बंधाऱ्यांचे पाणी सोडावे लागले. आता २.२ मीटरपर्यंत पातळी आलेली असून पंपिंगसाठी ती पुरेशी असल्याचा दावा त्यांनी केला. एकीकडे नद्यांच्या पाणी पातळी घट झाल्याचे दिसून येत असताना जलस्रोत खात्याकडून मात्र धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. गांजे-ओपा, साळ-आमठाणे, झुवारी-म्हादई नद्यांच्या आंतरजोडणीमुळे पाण्याची उपलब्धता पुरेशी असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
जलस्त्रोत विभागाचा अजब दावा
एकीकडे नद्यांच्या पाणी पातळी घट झाल्याचे दिसून येत असताना जलस्रोत खात्याकडून मात्र धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. डोंगराळ भागात जाण्यासाठी व्यवस्थित रस्तेही नसल्याने लहान वाहनांचे टँकर्स वापरले जात आहेत. यंत्रणेने काही खासगी टँकर्स भाड्याने घेतले आहेत.