सुखोई-३० भेदणार दृष्टीपल्याडचे लक्ष्य
By admin | Published: October 2, 2015 11:48 PM2015-10-02T23:48:44+5:302015-10-02T23:48:44+5:30
ब्रह्मोस क्षेपणास्त्रामुळे सुमारे ३०० कि.मी.वरील लक्ष्याचा अचूक वेध घेणे शक्य होणार असतानाच वायुदलाच्या सुपर-३० लढाऊ विमानाच्या वैमानिकांनी दृष्टिपलीकडील लक्ष्य गाठण्याची
नवी दिल्ली: ब्रह्मोस क्षेपणास्त्रामुळे सुमारे ३०० कि.मी.वरील लक्ष्याचा अचूक वेध घेणे शक्य होणार असतानाच वायुदलाच्या सुपर-३० लढाऊ विमानाच्या वैमानिकांनी दृष्टिपलीकडील लक्ष्य गाठण्याची तसेच रात्रीची उड्डाण क्षमता वाढविण्याची तयारी सुरू केली आहे. ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र युद्धात ‘गेम चेंजर’ मानले जाते.
या विमानांची नवी आवृत्ती असलेल्या सुपर-३० विमानांमध्ये दृष्टिपलीकडील लक्ष्य गाठण्याची(बीव्हीआर) क्षमता असेल, असे एका वरिष्ठ आयएएफ अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तान सीमेलगतच्या चौक्यांवरील वायुदलतळावर तैनात या अधिकाऱ्याने यानंतरचे युद्ध पाकिस्तानसोबत १९६५ किंवा १९७१ मध्ये झालेल्या युद्धाप्रमाणे नसेल हेही स्पष्ट
केले.
सध्या लढाऊ जेट विमाने अत्याधुनिक रडार यंत्रणेने सज्ज आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष दृष्टिपथात नसलेल्या लक्ष्याचा वेध घेणे शक्य होते. शत्रूचे विमान हेरले गेल्यास बीव्हीआर क्षेपणास्त्र डागले जाऊ शकते, असे विंग कमांडर शरद शर्मा
यांनी सांगितले. त्यांनी सुखोई विमानांचे एक हजार तासांपेक्षा जास्त उड्डाण केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सध्या सुखोईवरील बीव्हीआर क्षेपणास्त्रांची क्षमता ५० ते ७० कि.मी.वरील लक्ष्य गाठण्याची आहे. ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त गती असलेले ब्रह्मोस जोडले जाताच ही क्षमता काही पटींनी वाढणार आहे. त्यामुळे युद्धाच्या स्थितीत चित्र पालटून टाकण्याची क्षमता(गेम चेंजर) ब्रह्मोसमध्ये आहे.