गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांकडे कोट्यवधींची मालमत्ता?

By admin | Published: August 22, 2015 12:43 AM2015-08-22T00:43:32+5:302015-08-22T00:43:32+5:30

Goa's former Chief Minister's property worth billions? | गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांकडे कोट्यवधींची मालमत्ता?

गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांकडे कोट्यवधींची मालमत्ता?

Next
>लुईस बर्जर लाच प्रकरण : इडीच्या छाप्यात माहिती उघड

पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणात गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या निवासस्थानांवर व कार्यालयात गुरुवारी टाकलेल्या छाप्यात अंमलबजावणी संचालनालयाला (इडी) १०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे कागदपत्र मिळाले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
जमीन हस्तांतरण संबंधीच्या १५० फाईल्सही जप्त केल्याचे समजते. गुरुवारी जप्त केलेल्या कागदपत्रांची शुक्रवारी छाननी केली. त्यातून बर्‍याच गोष्टी उघडकीस आल्या आहेत. फाईल्सची छाननी करण्याचे काम सुरू आहे. पिंकी लवंदे यांचे तीन बँकेमधील लॉकर्स तपासले, त्यात एकूण ८.५ लाख रुपये मूल्याचे विदेशी चलन जप्त केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाच्या गोवा विभागाकडून क्राईम ब्रँचच्या मदतीने गुरुवारी दिगंबर कामत यांचे निवासस्थान व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे घर व कार्यालयांवर छापे टाकण्यात आले होते. त्यात महत्त्वाची कागदपत्रे आणि आणि विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. कामत यांचे जवळचे नातेवाईक गौरिष ऊर्फ पिंकी लवंदे यांचे कांपाल येथील निवासस्थान आणि कार्यालय, पणजी येथील आल्फान प्लाझा इमारतीतील निलेश लवंदे यांच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Goa's former Chief Minister's property worth billions?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.