गोव्याचे कारागृह बनणार पर्यटन स्थळ

By admin | Published: May 14, 2016 02:24 AM2016-05-14T02:24:50+5:302016-05-14T02:24:50+5:30

गोव्याच्या अग्वादा येथील ऐतिहासिक मध्यवर्ती कारागृह आता केवळ कैद्यांचे घर राहणार नाही. या कारागृहाचे पर्यटन स्थळात रूपांतर केले जाणार आहे.

Goa's jurisdiction becomes a tourist destination | गोव्याचे कारागृह बनणार पर्यटन स्थळ

गोव्याचे कारागृह बनणार पर्यटन स्थळ

Next

पणजी : गोव्याच्या अग्वादा येथील ऐतिहासिक मध्यवर्ती कारागृह आता केवळ कैद्यांचे घर राहणार नाही. या कारागृहाचे पर्यटन स्थळात रूपांतर केले जाणार आहे. राज्य पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या कारागृहात मोठा बदल केला जाणार आहे.
३० मे २०१५ पासून हे कारागृह कैद्यांचे आवास राहिलेले नाही. सर्व कैद्यांना नव्या कारागृहात स्थानांतरित करण्यात आले आहे. या कारागृहाचे हिमाचल प्रदेशच्या धागशाई कारागृह आणि अंदमानच्या सेल्युलर कारागृहाप्रमाणेच संग्रहालयात रूपांतर केले जाईल, असे पर्यटन विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. धाागशाई कारागृह आणि अंदमानचे सेल्युलर कारागृह ही ब्रिटिश काळातील कारागृहे आहेत.

Web Title: Goa's jurisdiction becomes a tourist destination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.