गोव्यात नाताळलाही पर्यटकांची पाठ नोटाबंदीचा फटका; हॉटेलांमधील २५ टक्के खोल्या रिकाम्याच

By admin | Published: December 23, 2016 07:57 PM2016-12-23T19:57:10+5:302016-12-23T19:57:10+5:30

पणजी : गोव्यातील पर्यटनाला नोटाबंदीचा जबर फटका बसला असून नाताळसाठी एरव्ही पर्यटकांची गर्दी दिसते तशी या वेळी ती दिसत नसल्याने हॉटेल व्यावसायिकही हतबल झाले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी राज्याच्या किनारी भागात होणार्‍या पार्ट्यांवरही यंदा याचा परिणाम दिसणार आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार्‍या पार्ट्यांना थंडा प्रतिसाद दिसत आहे.

Goa's tourists also face a knock-down effect of tourists; 25 percent of the rooms in the hotel empty | गोव्यात नाताळलाही पर्यटकांची पाठ नोटाबंदीचा फटका; हॉटेलांमधील २५ टक्के खोल्या रिकाम्याच

गोव्यात नाताळलाही पर्यटकांची पाठ नोटाबंदीचा फटका; हॉटेलांमधील २५ टक्के खोल्या रिकाम्याच

Next
जी : गोव्यातील पर्यटनाला नोटाबंदीचा जबर फटका बसला असून नाताळसाठी एरव्ही पर्यटकांची गर्दी दिसते तशी या वेळी ती दिसत नसल्याने हॉटेल व्यावसायिकही हतबल झाले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी राज्याच्या किनारी भागात होणार्‍या पार्ट्यांवरही यंदा याचा परिणाम दिसणार आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार्‍या पार्ट्यांना थंडा प्रतिसाद दिसत आहे.
हॉटेलांमधील सरासरी २५ टक्के खोल्या रिकाम्या आहेत. किनारे, धार्मिक स्थळे तसेच पर्यटनस्थळांबरोबरच कॅसिनो आणि बाजारपेठांमध्येही पर्यटकांचे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. विदेशी पर्यटकांना चलन बदलून घेण्याच्या बाबतीत मोठी समस्या निर्माण झाली आहे. मनी एक्स्चेंज आस्थापनांमध्ये डॉलर्स, पौंड किंवा अन्य विदेशी चलनाच्या बदल्यात भारतीय नोटा देण्यासाठी उपलब्ध नाहीत. विदेशी पाहुण्यांना आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डांवरच व्यवहार करावे लागत आहेत.
हॉटेल व्यावसायिक नंदन कुडचडकर यांच्याशी संपर्क साधला असता गोव्याच्या पर्यटनावर याचा मोठा परिणाम झाला असल्याचे त्यांनी सांगितले. विदेशी पर्यटकांना तर सुरुवातीच्या काळात आठवड्याला केवळ १00 डॉलर्स भारतीय चलनात बदलून दिले जात असत. ५ हजार रुपयांमध्ये आठवडा कसा घालवायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अनेक विदेशी पर्यटकांनी त्यामुळे दौरे आटोपते घेऊन मायदेशी परतणे पसंत केले. डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड स्वाइप करण्याची मशिन्स अजूनही अनेक आस्थापनांकडे उपलब्ध नाहीत तेथे पर्यटकांना रोखीनेच व्यवहार करावे लागतात.
टूर ॲण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी)चे माजी अध्यक्ष तथा गोव्यातील आघाडीचे हॉटेल व्यावसायिक राल्फ डिसोझा म्हणाले की, नोटाबंदीमुळे पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली असून १0 ते १५ टक्के खोल्या रिकाम्याच आहेत. एरव्ही या दिवसांत खोल्या फुल्ल असायच्या. यात भर म्हणून सनबर्न व सुपरसोनिक या मोठ्या पार्ट्या यंदा गोव्यात होणार नसल्याने त्याचाही परिणाम पर्यटनावर झालेला आहे. तीन तारांकित, चार तारांकित, पंचतारांकित हॉटेलांमध्ये लोक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डांचा वापर करतात; परंतु एक किंवा दोन तारांकित हॉटेलांमध्ये अडचण येते. किनार्‍यांवरील शॅक, रेस्टॉरंटवाल्यांचा व्यवसायही मंदावला आहे. विदेशी पर्यटकांना सहलीचे निम्मे दिवस डॉलर्स किंवा अन्य चलन बदलण्यातच घालवावे लागतात. अनेकदा मनी एक्स्चेंज आस्थापनांमध्ये डॉलरसाठी कमी दर देऊन त्यांची बोळवण केली जाते.
गोव्यात एरव्ही नाताळच्या आठवडाभर अगोदर देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी उसळत असे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रकारही घडत असत; परंतु यंदा तशी गर्दी दिसत नाही. मिरामार, कळंगुट, वागातोर, हणजूण, मोरजी, मांद्रे, हरमल आदी उत्तर गोव्यातील किनार्‍यांवर तसेच कोलवा, बाणावली, बेताळभाटी आदी दक्षिणेतील किनार्‍यांवर पर्यटकांची संख्या तुलनेत कमीच दिसून येत आहे.
कॅसिनोंमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. गिर्‍हाईक नसल्याने काही कॅसिनोवाल्यांनी प्रवेश शुल्कही न भरण्याची मुभा दिलेली आहे. व्यवसायावर मोठा परिणाम झाला असल्याचे एका कॅसिनोमालकाने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. (प्रतिनिधी)
...........................................................

Web Title: Goa's tourists also face a knock-down effect of tourists; 25 percent of the rooms in the hotel empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.