प्रादेशिकसाठी हिंगणे येथे बिबट्याने पाडला बकरीचा फडशा

By admin | Published: August 25, 2015 09:57 PM2015-08-25T21:57:59+5:302015-08-25T21:57:59+5:30

जळगाव- जामनेर तालुक्यात हिंगणे येथे मंगळवारी सायंकाळी बिबट्याने बकरीचा फडशा पाडला, त्यानंतर तो गावातून पसार झाला. याच गावात तो सकाळीदेखील आला होता. यानंतर सकाळी ७ वाजेच्या सुमारास गावालगतच्या एका शेतात त्याचे काही ग्रामस्थांना दर्शन झाले होते.

Goat Fleas with a Hinged Hinge for Regional | प्रादेशिकसाठी हिंगणे येथे बिबट्याने पाडला बकरीचा फडशा

प्रादेशिकसाठी हिंगणे येथे बिबट्याने पाडला बकरीचा फडशा

Next
गाव- जामनेर तालुक्यात हिंगणे येथे मंगळवारी सायंकाळी बिबट्याने बकरीचा फडशा पाडला, त्यानंतर तो गावातून पसार झाला. याच गावात तो सकाळीदेखील आला होता. यानंतर सकाळी ७ वाजेच्या सुमारास गावालगतच्या एका शेतात त्याचे काही ग्रामस्थांना दर्शन झाले होते.
यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. या घटनेनंतर गावात वन विभागाचे कर्मचारी व काही वन्यप्राणी प्रेमी मंडळी पोहोचली. वन विभागाचे दोन कर्मचारी व वन्यप्राणीप्रेमी वासुदेव वाढे, रवींद्र सोनवणे, बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे आदींचा त्यात समावेश होता. कॅमेर्‍यामध्ये पायाचे ठसे घेण्याचे काम सायंकाळी सुरू झाले. बिबट्यासाठी मृत बकरी एका शेतात ठेवण्यात आली. पण रात्रीपर्यंत बिबट्या या बकरीनजीक आलेला नसल्याची माहिती वाढे यांनी दिली.

Web Title: Goat Fleas with a Hinged Hinge for Regional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.