प्रपंचरूपी भिंतीवर धर्मरूपी द

By admin | Published: July 12, 2015 09:58 PM2015-07-12T21:58:07+5:302015-07-12T21:58:07+5:30

रवाजा हवा

The Goddess of Religion | प्रपंचरूपी भिंतीवर धर्मरूपी द

प्रपंचरूपी भिंतीवर धर्मरूपी द

Next
ाजा हवा
संजय महाराज : गगनगिरी महाराज सप्ताह
संगमनेर : पाण्याची श्रीमंती टिकवून ठेवायची असेल तर धरणाला भिंत व दरवाजा आवश्यक आहे. म्हणून प्रपंचरूपी भिंतीवर धर्मरूपी दरवाजा असला पाहीजे. तसे नसेल तर प्रपंच एक ना एक दिवस फुटल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांनी केले.
नागापूरवाडी येथे प.पू. गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात रामकथेचे तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. महाराज म्हणाले, गरीबी व श्रीमंती यात कुठलाही फरक नसतो. परंतू प्रपंच हा दोन्हींचा एकच असतो. गरीब व श्रीमंतात फरक असला तरी मृत्यूत नसतो. साप व सोन्याची रास एक आहे. मात्र दोन्हींपासून सावध राहावे लागते. धर्मकार्यासाठी वापरल्या जाणार्‍या संपत्तीतून तुमचा उध्दार झाल्याशिवाय राहणार नाही. प्रपंच हा धर्मावर चालतो. त्यामूळे प्रत्येकाची धर्मावर निष्ठा असायला पाहीजे. रामकथेची जागा महाभारताने घेवू नये, असे तुम्हाला वाटत असेल तर ती प्रत्येकाच्या घरात असली पाहीजे. मूलीच्या बापाला सुवर्ण दान करता नाही आले, तरी चालेल. पण, कन्यादान करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सप्ताहाला हजेरी लावत बळीराजावर आलेले दूबार पेरणीचे संकट दूर होवून शेतात सोनं पिकू दे, अशी प्रार्थना केली. याप्रसंगी जि.प. सदस्या कांचन मांढरे, दिलीप शिंदे, बाळासाहेब अंभोरकर, सागमनाथ ढोले, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, कार्तीक तांगडकर, स्वप्नील महाराज, सचीन महाराज, आबासाहेब थोरात, वसंत देशमुख, सुरेश थोरात, मिनाक्षी थोरात, ॲड. दादाभाऊ वर्पे, बंडू देशमुख, शेखर गाडे, कपील पवार, राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The Goddess of Religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.