मोदींचा कडक निर्णय जनतेसाठी गोडच - नाना पाटेकर

By admin | Published: November 16, 2016 03:56 PM2016-11-16T15:56:02+5:302016-11-16T15:56:02+5:30

५०० व १ हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा पंतप्रधान मोदींनी घेतलेला कडक निर्णय जनतेसाठी गोड आहे, अशा शब्दांत नाना पाटेकरने मोदींचे कौतुक केले.

Goddess Rigorous Decision for Modi - Nana Patekar | मोदींचा कडक निर्णय जनतेसाठी गोडच - नाना पाटेकर

मोदींचा कडक निर्णय जनतेसाठी गोडच - नाना पाटेकर

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० व १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा घेतलेला कडक निर्णय देशातील प्रामाणिक जनतेसाठी मात्र गोड असल्याचे सांगत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी नोटबंदीचे स्वागत करत मोदींचे कौतुक केले. तसेच ' इतक्या वर्षांपासून आपण इतकं काही सहन केलं आहे, मग आता देशासाठी १०-२० दिवस त्रास सहन करू शकत नाही का? असा सवालही त्यांनी विचारला. नुकतीच त्यांनी जम्मू-काश्मीर येथील कठुआ जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. 
काळ्या पैशा विरोधातील मोहिम तीव्र करत व्यवहारातून ५०० व १०००च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केला. आठवड्याभरातनंतरही सोशल मीडियावरही हा मुद्दा सध्या भलताच चर्चेत असून अमिताभ बच्चन, अभिनेत्री अनुष्का शर्मा, हुमा कुरेशी, परेश रावल, सुनील शेट्टी, मधुर भांडारकर, विराट कोहली, अनिल कुंबळे यासारख्या अनेक दिग्गज आणि सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया देत मोदींच्या निर्णयाचे कौतुक केले. त्यात आता नाना पाटेकरांच्या नावाचीही भर पडली.  

Web Title: Goddess Rigorous Decision for Modi - Nana Patekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.