जावयासोबत सासू रफुचक्कर
By admin | Published: December 12, 2015 12:30 AM2015-12-12T00:30:57+5:302015-12-12T00:30:57+5:30
जळगाव: सासू व जावई यांच्यात निर्माण झालेल्या प्रेमप्रकरणातून ३८ वर्षी सासुने २५ वर्षीय जावयाला सोबत घेवून पळ काढला. तब्बल नऊ दिवसानंतर ते हाती लागले असून दोघांनाही शुक्रवारी संध्याकाळी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सासुने पतीसोबत जाण्यास नकार दिल्याने नातेवाईक व पोलिसांचीही पंचाईत झाली होती, रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला समजोता सुरुच होता.
Next
ज गाव: सासू व जावई यांच्यात निर्माण झालेल्या प्रेमप्रकरणातून ३८ वर्षी सासुने २५ वर्षीय जावयाला सोबत घेवून पळ काढला. तब्बल नऊ दिवसानंतर ते हाती लागले असून दोघांनाही शुक्रवारी संध्याकाळी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सासुने पतीसोबत जाण्यास नकार दिल्याने नातेवाईक व पोलिसांचीही पंचाईत झाली होती, रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला समजोता सुरुच होता.भुसावळ तालुक्यातील एका गावातील तरुणाचे जळगाव शहरातील एका तरुणीशी पाच महिन्यापुर्वी विवाह झाला होता. गावात काहीच कामधंदा नसल्याने तो जळगावातच सासर्याच्या शेजारी घर घेवून वास्तव्याला होता. सासर्याने त्याला घरगुती मेसमध्ये कामाला लावले परंतु, तेथेही काही दिवसातच त्याने काम सोडले. पत्नी दुसरीकडे धुणी-भांडी तसेच मिळेत तो रोजगार करीत होती. या तरुणाला काहीच कामधंदा नसल्याने तो घरीच राहत होता. सासरा कामावर तर इकडे पत्नीही कामावर असल्याने दोघांच्या घरी सासू व जावई हेच एकटे राहत होते. त्यात दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुटला. प्रेम इतके बहरले की दोघांनी तीन नोव्हेंबर रोजी घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोघांचे बींग फुटल्याने तरुणाच्या भावाने मात्र त्यावर पडदा टाकण्याचे काम केले. दोघं जण कामानिमित्त बाहेर गावी असल्याचे तो वांरवार सांगू लागला. शेवटी तरुणाच्या पत्नीने व सासर्याने शुक्रवारी पोलीस स्टेशन गाठले. सकाळी दोघांना पोतिलसांनी फोनवरुन दम दिला, तेव्हा ते मुक्ताईनगरला असल्याचे समजले. त्यावरुन मुलीच्या नातेवाईकांनी स्वतंत्र वाहनाने मुक्ताईनगर गाठून दोघांना पोलीस स्टेशनला आणले.सामाजिक कार्यकर्त्या मंगला बारी व दोघांच्या नातेवाईकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यात जावई पत्नीसोबत जायला तयार झाला तर सासूने मात्र पतीसोबत जाण्यात नकार दिला. जावयासोबत जाण्यास मात्र ती राजी झाली होती. रात्री उशिरा तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु होता.