मनपातील बदल्यांमध्ये गोलमाल उपायुक्तांची मनमानी : भांडार विभागप्रमुखपदी राजेंद्र पाटील यांची वर्णी

By admin | Published: May 29, 2016 06:31 PM2016-05-29T18:31:54+5:302016-05-29T18:31:54+5:30

जळगाव : मनपातील काही प्रमुख अधिकार्‍यांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या. मात्र त्यात आयुक्तांना अंधारात ठेवत उपायुक्त प्रदीप जगताप यांनी मनमानी करीत भांडार विभागप्रमुखपदी राजेंद्र पाटील यांची परस्पर वर्णी लावली असल्याचे समजते.

Golamal Deputy Managing Director of Police Department: Rajendra Patil | मनपातील बदल्यांमध्ये गोलमाल उपायुक्तांची मनमानी : भांडार विभागप्रमुखपदी राजेंद्र पाटील यांची वर्णी

मनपातील बदल्यांमध्ये गोलमाल उपायुक्तांची मनमानी : भांडार विभागप्रमुखपदी राजेंद्र पाटील यांची वर्णी

Next
गाव : मनपातील काही प्रमुख अधिकार्‍यांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या. मात्र त्यात आयुक्तांना अंधारात ठेवत उपायुक्त प्रदीप जगताप यांनी मनमानी करीत भांडार विभागप्रमुखपदी राजेंद्र पाटील यांची परस्पर वर्णी लावली असल्याचे समजते.
आयुक्तांची सूचना नसताना व आस्थापना विभागाच्या टिपणीतही प्रस्तावित नसताना उपायुक्तांनी स्वत:च्या हस्ताक्षरात बदली आदेशावर हा बदल केला आहे. त्यामुळे उपायुक्तांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भांडार विभागप्रमुख पदावरून राजेंद्र पाटील यांची आयुक्तांनी बदली केली होती. त्यांना प्रमुख लेखापाल व जन्म-मृत्यू निबंधकपदाचा पदभार देण्यात आला होता. मात्र प्रभारी नगरसचिव निरंजन सैंदाणे हे सेवाज्येष्ठ असल्याने त्यांना प्रमुख लेखापालपदी नियुक्ती मिळायला हवी, अशी मागणी होती. त्यानुसार आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेअंती सैंदाणे यांना प्रमुख लेखापाल तर राजेंद्र पाटील यांना जन्म-मृत्यू निबंधक व प्रभारी नगरसचिव पदाचा पदभार द्यावा, असे ठरले होते. त्यानुसार आस्थापना विभागाने टिपणीही तयार केली होती. मात्र त्यानंतर महापौरांना हा विषय समजल्यानंतर त्यांच्याशी याबाबत चर्चा झाली. राजेंद्र पाटील यांना नगरसचिवपद पेलवणार नाही, असे महापौरांचे मत असल्याने सैंदाणे यांच्याकडे प्रमुख लेखापाल पदासह नगरसचिव पदाचाही पदभार ठेवण्याचे निि›त करण्यात आले. त्यानुसार आस्थापना विभागाने टिपणी तयार केली व बदली आदेशही तयार केले. मात्र उपायुक्तांनी स्वत:च्या मर्जीतील राजेंद्र पाटील यांच्याकडे भांडार विभागप्रमुख पदाचीही जबाबदारीही सोपवावी असा बदल स्वहस्ताक्षरात बदली आदेशावर केला. त्यानुसार बदली आदेश सुधारीत करून देण्यात आले. आस्थापना विभागाच्या टिपणीतही तसा बदल करण्याच्या सूचना उपायुक्तांनी दिल्या. मात्र आयुक्तांशी व महापौरांशी झालेल्या चर्चेनुसारच टिपणी ठेवलेली असल्याने त्यात बदल करण्यास आस्थापना विभागाने नकार दिल्याचे समजते. आता आयुक्त संजय कापडणीस हे रजेवरून परतल्यानंतर काय भूमिका घेतात? याबाबत उत्सुकता आहे.
-----
अतिक्रमण कारवाईसाठी मात्र आयुक्तांची प्रतीक्षा
एकीकडे आयुक्तांना अंधारात ठेवत मर्जीतील अधिकार्‍यांच्या सोयीच्या ठिकाणी बदली करण्याचे निर्णय घेणार्‍या उपायुक्तांना पूर्वीच ठरलेल्या नियोजनानुसार गणेश कॉलनी रस्त्यावरील हॉकर्सचे ट्रॅफिक गार्डनलगतच्या सिव्हीक सेंटरच्या जागेवर प˜े आखून स्थलांतर करण्यासाठी मात्र मनपा आयुक्तांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. ही टाळाटाळ कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे.
-----
दुसर्‍यांदा प्रकार
उपायुक्त जगताप यांनी आयुक्तांना अंधारात ठेवून मर्जीतील माणसाची सोयीच्या ठिकाणी बदली करण्याचा हा दुसरा प्रकार आहे. यापूर्वी एलबीटी विभागातून आयुक्तांनी बदली केलेल्या सतीश शुक्ला यांची उपायुक्तांनी नंतर सोयीने आयुक्तांना अंधारात ठेवत बदली केल्याचे उघड झाले होते.

Web Title: Golamal Deputy Managing Director of Police Department: Rajendra Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.