सोने-चांदीच्या भावात नव्या खरेदीने सुधारणा
By admin | Published: July 21, 2014 11:47 PM2014-07-21T23:47:47+5:302014-07-21T23:47:47+5:30
जागतिक बाजारातील मजबूत स्थितीच्या पाश्र्वभूमीवर राजधानी नवी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या भावात सराफा व्यापा:यांकडून झालेल्या ताज्या मागणीमुळे सुधारणा झाली.
Next
नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मजबूत स्थितीच्या पाश्र्वभूमीवर राजधानी नवी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या भावात सराफा व्यापा:यांकडून झालेल्या ताज्या मागणीमुळे सुधारणा झाली. यामुळे सोमवारी सोन्याचा भाव 25 रुपयांच्या किरकोळ वाढीसह 28,475 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. चांदीचा भावही औद्योगिक संस्था आणि नाणोनिर्मात्यांकडून चांगली मागणी झाल्याने 25क् रुपयांनी वधारून 45,4क्क् रुपये प्रतिकिलो राहिला.
दिल्ली बाजारातच 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 25 रुपयांनी वाढून अनुक्रमे 28,475 रुपये आणि 28,475 रुपये प्रति दहा ग्रॅम राहिला. तथापि, आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 24,9क्क् रुपयांवर कायम राहिला.
तयार चांदीचा भाव 25क् रुपयांनी वाढून 45,4क्क् रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलीव्हरीचा भाव 155 रुपयांनी महाग होऊन 45,क्85 रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव 1,क्क्क् रुपयांनी उंचावून खरेदीसाठी 8क्,क्क्क् रुपये आणि विक्रीसाठी 81,क्क्क् रुपये प्रतिशेकडा राहिला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
लंडन बाजारात हाच कल दिसून आला. सोन्याचा भाव क्.3 टक्क्यांनी उंचावून 1,314.55 डॉलर आणि चांदी क्.5 टक्क्यांनी वधारून 2क्.96 डॉलर प्रतिऔंस झाली.