गोमूत्रामध्ये सापडले सोन्याचे अंश ?
By admin | Published: June 29, 2016 01:20 PM2016-06-29T13:20:50+5:302016-06-29T13:36:46+5:30
गुजरातमधील जुनागड कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी गायीच्या मूत्रामध्ये सोन्याचे अंश सापडल्याचा दावा केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. २९ - गुजरातमधील जुनागड कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी गायीच्या मूत्रामध्ये सोन्याचे अंश सापडल्याचा दावा केला आहे. गीर प्रजातीच्या गोमूत्रामध्ये त्यांना सोन्याचे अंश आढळून आले आहेत. डॉ.बी.ए.गोलाकीया यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करणा-या टीमने गोमूत्राच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी जीसी-एमएस पद्धतीचा अवलंब केला.
गोलकीया जेएयू बायोटेक्नोलॉजी खात्याचे प्रमुख आहेत. ५०० नमुन्याच्या तपासणीमध्ये प्रत्येक लिटर मागे १० ते ३० मिलीग्रामपर्यंत सोन्याचे अंश सापडले असा दावा डॉ. गोलाकीया यांनी एएनआयशी बोलताना केला. जेएयूची स्वत:ची प्रयोगशाळा असून, मागच्या सात वर्षांपासून त्यांचे गोमूत्रावर संशोधन सुरु आहे.
गोमूत्राचे ५०० पेक्षा अधिक नमूने गोळा करुन त्यावर संशोधन करण्यात आले. प्रतिलिटर यूरीनमध्ये १० ते ३० मिलीग्रामपर्यंत सोन्याचे अंश असल्याचे त्यांनी सांगितले. गायीच्या वयानुसार सोन्याचे जे अंश मिळतात त्यात फरक असतो. पण सर्व नमुन्यांमध्ये सोने सापडले असे डॉ. गोलाकीया यांनी सांगितले.