Gold in Bihar: बिहारमधील KGF; मुंग्यांमुळे सापडली देशातील सर्वात मोठी सोन्याची खान, येथे आहे 23 कोटी टन सोने

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 04:45 PM2022-05-31T16:45:29+5:302022-05-31T16:46:13+5:30

Gold in Bihar: भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने बिहारच्या जमुई जिल्ह्यात 23 कोटी टन सोने आणि 37.6 टन इतर खनिजे असल्याचा दावा केला आहे. आता लवकरच बिहार सरकारने या सोन्याच्या खाणीतून खाणकाम करण्यास परवानगी देणार असल्याची माहिती आहे.

Gold in Bihar: The country's largest gold mine discovered by ants in Bihar, it has 23 crore tonnes of gold | Gold in Bihar: बिहारमधील KGF; मुंग्यांमुळे सापडली देशातील सर्वात मोठी सोन्याची खान, येथे आहे 23 कोटी टन सोने

Gold in Bihar: बिहारमधील KGF; मुंग्यांमुळे सापडली देशातील सर्वात मोठी सोन्याची खान, येथे आहे 23 कोटी टन सोने

googlenewsNext

Gold in Bihar: आपल्या भारत देशाला 'सोने कि चिडिया' म्हटले जाते. देशात अनेक ठिकाणी सोन्याचा साठा आहे. बिहारमध्येही सोन्याचा देशातील सर्वात साठा सापडला आहे. माओवाद्यांचे वर्चस्व असलेल्या बिहारच्या जमुईमध्ये हा साठा सापडला आहे. इथल्या लाल मातीखाली इतकं सोनं आहे, याची कल्पनाही कुणी करू शकत नाही. संपूर्ण देशातील सोन्याच्या साठ्यापैकी 44% सोन्याचा साठा इथे असल्याचे बोलले जाते. हा सोन्याचा साठा आता प्रसिद्धीच्या झोतात आला आहे, कारण बिहार सरकारने या सोन्याच्या खाणीतून खाणकाम करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने शनिवारी (28 मे 2022) प्रसारमाध्यमांमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) ने बिहारच्या जमुई जिल्ह्यात सुमारे 230 दशलक्ष टन (सुमारे 222.88 दशलक्ष टन) सोन्याचे सर्वेक्षण केले आहे. त्यांनी सोन्यासह सुमारे 37.6 टन खनिज धातूचा देखील अहवाल दिला आहे. हे पाहता नितीश कुमार सरकारने नुकतेच जमुई जिल्ह्यातील त्या भागात सोन्याचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मुद्द्यावर केंद्राशी चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.

मुंग्यांनी शोधले सोने
बिहारच्या या भागात सोन्याचे साठे शोधण्यास सुमारे 40 वर्षे लागली असल्याचे सांगितले जाते. तसेच, हे सोने सापडण्यात मुंग्यांचा मोठा हात आहे. चाळीस वर्षांपूर्वी या परिसरात एक मोठा वटवृक्ष असल्याची आख्यायिका या परिसरात आहे. उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी मुंग्या वडाच्या झाडाखाली घरटी बनवायची. मुंग्यांनी खालून माती उचलायला सुरुवात केली तेव्हा स्थानिक लोकांना पिवळ्या धातूचे छोटे कणही मातीत मिसळलेले दिसल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ही बातमी पंचक्रोशित पसरली. तेव्हापासून या भागात सोने असल्याची चर्चा सुरू झाली.

केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य
बिहारच्या जमुई जिल्ह्यातील मोठ्या सोन्याच्या साठ्यावर केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गेल्या वर्षी लोकसभेत चर्चा केली होती. त्यावेळीही हे प्रकरण झपाट्याने चर्चेत आले. आता येथून सोने काढण्यासाठी बिहार सरकारकडून परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. अहवालानुसार, बिहारमधील जमुई जिल्ह्यातील करमाटिया, झाझा आणि सोनोमध्ये अनेक वर्षांपासून लोकांना सोने आणि खनिजे मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. ज्यावर राज्याच्या खाण आणि भूगर्भशास्त्र विभागानेही शिक्कामोर्तब केले आहे. विशेष म्हणजे भारतातील सर्वाधिक सोने कर्नाटक राज्यात सापडते. या राज्यातील कोलार सोन्याची खाण ही भारतातील सर्वात जुन्या आणि प्रमुख सोन्याच्या खाणींपैकी एक आहे. मात्र, ही सोन्याची खाण 2001 मध्ये बंद करण्यात आली आहे.

Web Title: Gold in Bihar: The country's largest gold mine discovered by ants in Bihar, it has 23 crore tonnes of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.