सहा कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, कोण आहेत हे महाकुंभ मेळ्यातील गोल्डन बाबा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 11:18 IST2025-01-18T11:17:43+5:302025-01-18T11:18:43+5:30
Mahakumbh Golden Baba: महाकुंभमेळ्यात एक बाबा आले आहेत, ज्यांच्या अंगावर तब्बल सहा किलो सोन्याचे दागिने आहेत.

सहा कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, कोण आहेत हे महाकुंभ मेळ्यातील गोल्डन बाबा?
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभमेळ्यात देश विदेशात लोक येत आहेत. वेगवेगळ्या वेशभूषा केलेले साधू, महाराज चर्चेचा विषय ठरले आहेत. महाकुंभमेळ्याला आलेल्या एका गोल्डन बाबांचीही चर्चा होत आहे. अंगावर तब्बल किलो सोन्याचे दागिने असलेल्या, या बाबांबद्दलच जाणून घेऊयात...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हाता अंगठ्या, गळ्यात सोन्याने मढवलेल्या रुद्राक्षाच्या माळा, हाता कडं अशा अवतारात एक गोल्डन बाबा महाकुंभ मेळ्याला आले आणि चर्चेचा विषय बनले आहेत. त्यांच्या अंगावर चार किलो सोन्याचे दागिने आहेत, ज्याची बाजारभावानुसार किंमत ६ कोटींच्या जवळपास आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे बाबा निरंजनी आखाड्यातील असल्याचे सांगितले जात आहे. या बाबाचे नाव आहे एस. के. नारायण गिरी महाराज! त्यांचं वय आहे ६७ वर्ष. ते मूळचे केरळचे रहिवाशी आहेत.
सध्या नारायण गिरी महाराज दिल्लीमध्ये राहतात. महाराजांचं म्हणणं असं की, त्यांच्या अंगावरील सर्व सोनं त्यांच्या साधनेशी निगडित आहे.
नारायण गिरी महाराजांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसा, त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केलं आहे. त्यांना गोल्डन बाबा म्हणण्याबद्दल कोणताही आक्षेप नाही. ते तिथे कुठे जातात, त्यांना बघण्यासाठी गर्दी होते. महाकुंभमेळ्यात आल्यानंतर त्यांनी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांची भेट घेतली.
नारायण गिरी महाराज यांच्या अंगावरील दागिने सोन्याचे आहेत, त्याचबरोबर घड्याळही सोन्याचेच आहे. त्यांच्याजवळ एक छडी आहे, जी सोन्याची असून, त्याला वेगवेगळ्या देवी आणि देवतांचे लॉकेट लावलेले आहेत.