सोन्याला 'ऐतिहासिक' झळाळी, तोळ्याचा दर 50 हजार पार; दोन वर्षांत होईल 'चमत्कार'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 01:28 PM2020-06-25T13:28:31+5:302020-06-25T13:30:56+5:30
Gold rates Today: कोरोनाची वाढ जरी कमी झाली, कितीही चांगले पॅकेज असले तरीही अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी कमीतकमी 2 वर्षे लागणार आहेत. यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होतच राहणार
नवी दिल्ली : एकीकडे लॉकडाऊनमधून दिलासा मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती विक्रम नोंदवत असताना सोन्याच्या किंमतींनीही विक्रमी झेप घेण्यास सुरुवात केली आहे. आज सोन्याच्या दराने 50000 चा आकडा पार केला असून दिल्लींध्ये प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50405 रुपयांवर गेली आहे. कोरोनामुळे जगाने धसका घेतल्याचा परिणाम भारतावरही दिसू लागला आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेसह अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि डॉलरच्या किंमतीमध्ये अस्थिरता दिसू लागल्याने सोन्याच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तसेच अमेरिकेसह अन्य देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा मार्ग पत्करला असून सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. कारण अन्य कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा चांगला परतावा देणारे एकमेव सोने हाच पर्याय आहे. यामुळे दिल्लीमध्ये काही दिवसांत सोन्याचा दर 51 हजारांवर जाईल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे सोन्यातील नफेखोरी अशीच सुरु राहिल्यास सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बुधवारी ऑगस्टमधील वायदा बाजारात सोन्याची किंमत 48,589 झाली होती.
अँजेल ब्रोकिंगच्या अनुज गुप्ता यांनी सांगितले की, सोन्याची किंमत पुढील एक-दोन महिन्यांत 51000 च्या आसपास जाईल. तर मोतिलाल ओस्वालच्या किशोर नर्ने यांनी सांगितले की, पुढील दोन वर्षांत सोन्याच्या किंमती 65 ते 68000 हजारावर जाण्याची शक्यता आहे. एवढी मोठी वाढ ही भारतीय रुपया आणि डॉलरच्या किंमतीवर अवलंबून असल्याचे ते म्हणाले.
दोन वर्षे लागणार
कोरोनाची वाढ जरी कमी झाली, कितीही चांगले पॅकेज असले तरीही अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी कमीतकमी 2 वर्षे लागणार आहेत. यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होतच राहणार असल्याचे ते म्हणाले.
जागतिक बाजारात सोन्याचे दर $1,750 प्रती औंस आहेत. याचा अर्थ सोन्याच्या दरांनी जुना $1,690 चा विक्रम मोडीत काढला आहे. आता स्पॉट गोल्डच्या ट्रेडिंगची पातळी to $1,815 प्रति औंसवर गेली आहे, असे मोतिलाल ओस्वालच्या सजेजा यांनी सांगितले.
अन्य महत्वाच्य़ा बातम्या...
बाबो! तब्बल 841 किमीच्या स्पीडने महिलेने कार पळवली; मृत्यूनंतर गिनिज बुकात नोंद
बहिष्काराचा धसका! Xiaomi ने दालनांवरील लोगो झाकले; 'Made in India' लिहिले
Coronil: रामदेव बाबांच्या कोरोनिल औषधावर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
Unlock1.0 घाम फोडणार! डिझेल पहिल्यांदाच 80 पार; महागाई वाढणार
न भूतो! पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महागले; राजधानीत विक्रम
CoronaVirus बनारसी साड्यांचे कारागीर बनवणार कोविड योद्ध्यांसाठी सुरक्षा कवच!
"रामदेव बाबांना नोबेल द्या"! ट्विटरवर 'कोरोनिल'वरून गट 'सक्रीय'