Gold Rate Today : सोन्या, चांदीचे दर गडगडले; कोरोना व्हॅक्सिनचा प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 11:39 AM2020-08-12T11:39:32+5:302020-08-12T11:41:43+5:30

Gold Silver Price: गेल्या सत्रामध्ये सोन्याच्या किंमती 3200 रुपयांनी घसरल्या होत्या. तर चांदी 9000 रुपये प्रति किलोने घसरली होती. याप्रकारे सोने केवळ दोन दिवसांत 4500 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

Gold Rate Today: Gold, silver prices fell; Effect of corona vaccine | Gold Rate Today : सोन्या, चांदीचे दर गडगडले; कोरोना व्हॅक्सिनचा प्रभाव

Gold Rate Today : सोन्या, चांदीचे दर गडगडले; कोरोना व्हॅक्सिनचा प्रभाव

Next

नवी दिल्ली : देशातील वायदा बाजारामध्ये बुधवारी सकाळी सोन्या, चांदीच्या दरांमध्ये मोठी घट नोंदविली गेली आहे. एमसीएक्स एक्स्चेंजवर  सकाळी 10 वाजता 5 ऑक्टोबर 2020 च्या सोन्याच्या वायदा किंमतीमध्ये 1,973 रुपयांची मोठी घट झाली. यावेळी सोने 49,956 रुपये प्रति 10 ग्रॅम ट्रेंड करत होते. तर 4 डिसेंबरच्या वायदा किंमतीमध्ये 1902 रुपयांची घट झाली. यावेळी सोने 50,207 रुपयांवर ट्रेंड करत होते. जागतिक स्तरावरही वायदा बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. 


तर चांदीच्या दरामध्ये 2700 रुपयांची घट झाली होती. सध्या सोन्याच्या दरात 1434 रुपयांची तर चांदीच्या दरात 4,659 रुपयांची घसरण झाली आहे. चांदी 62,275 रुपयांवर प्रति किलो झाली आहे. कोरोना लसीमुळे बाजारात गुंतवणूकदारांनी फायद्यासाठी सोन्याची विक्री केल्याने हे दर गडगडले आहेत. 


जागतिक बाजारातही आज सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली. ब्लूमबर्गनुसार बुधवारी सकाळी कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव 2.75 टक्के, 53.50 डॉलरच्या मोठ्या घसरणीनंतर 18,92.80 डॉलर प्रति औंस वर ट्रेंड करत होता. याशिवाय सोन्याच्या जागतिक हाजिर भावामध्ये 1.81 टक्के म्हणजे 34.65 डॉलरची घट नोंदविली गेली आहे. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या किंमतीमध्ये बुधवारी मोठी घट झाली. कॉमेक्सवर बुधवारी चांदीच्या वायदा बाजारात 6.75 टक्क्यांची घट झाली. यामुळे चांदी 24.29 डॉलर प्रति औंस ट्रेंड करत होती. तर जागतिक हाजिर भाव सध्या 3.21 टक्क्यांनी घसरला आहे. 


गेल्या सत्रामध्ये सोन्याच्या किंमती 3200 रुपयांनी घसरल्या होत्या. तर चांदी 9000 रुपये प्रति किलोने घसरली होती. याप्रकारे सोने केवळ दोन दिवसांत 4500 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदी 11,700 रुपयांनी स्वस्त झाले आहे. भारतात  सोन्याची किंमत 56000 पेक्षा अधिक झाली होती. तर चांदी जवळपास 78000 रुपये झाली होती. 
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

OMG! न्युझीलंडवर कोरोनाचा छुपा वार; 102 दिवसांनंतर 4 नवे रुग्ण, ऑकलंड लॉकडाऊन

CoronaVaccine: कोरोना लसीवर रशियाचा शॉर्टकट धोक्याचा; जागतिक तज्ज्ञांचा गंभीर इशारा

पंतप्रधान मोदी लवकरच मोठ्या घोषणा करण्याची शक्यता; हे आहेत अंदाज

खतरनाक Video! WWE मध्ये नव्या सुपरस्टार्सची एन्ट्री; रिंगच तोडल्याने भरली धडकी

चिनी कंपन्यांवर आयकर विभागाचे छापे; 1000 कोटींचे हवाला 'घबाड' हाती लागले

मध्यरात्री पानिपतच्या हायवेवर 'पती, पत्नी और वो'मध्ये धुमशान; दीराच्या मदतीने पकडले

Gold Rate: सोन्याची झळाळी! दिवाळीपर्यंत 70000 वर जाण्याची शक्यता; गुंतवणूक करायची का?

राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले 50 कोटी; जाणून घ्या व्हायरल सत्य

Web Title: Gold Rate Today: Gold, silver prices fell; Effect of corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.