सोन्याच्या किंमतीने नोंदविले नवे रेकॉर्ड; वायदा बाजारात उच्चांक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 11:46 AM2020-04-15T11:46:58+5:302020-04-15T11:49:54+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत घटली आहे.
नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतींमध्ये सतत वाढ पहायला मिळत आहे. बुधवारी सोन्याच्या किंमतीने नवे रेकॉर्ड नोंदवत उच्च स्तरावर पोहोचले आहे. एमसीएक्स एक्स्चेंजवर बुधवारी ट्रेडिंगवेळी पाच जून २०२० च्या सोन्याच्या वायदा दराने ४६६७० रुपये प्रति ग्रॅमची उंची गाठत नवीन रेकॉर्ड बनविले आहे. हा आतापर्यंतचा उच्च स्तर आहे.
याशिवाय ५ ऑगस्ट २०२० च्या वायदा दराने बुधवारी 0.85 टक्के म्हणजेच ३९६ रुपयांची वाढ नोंदविली आहे. हा दर 46,850 रुपये प्रति 10 ग्रामवर ट्रेंड करत आहे. हा या सोन्याचा आतापर्यंतचा उच्च स्तर आहे.
तर वायदा बाजारात चांदीच्या किंमतींमध्येही वाढ झाली आहे. एमसीएक्सवर मे २०२०च्या चांदीचा वायदा भाव १.५२ टक्के म्हणजेच ६६४ रुपयांनी वाढून 44,420 रुपये प्रति किलो झाला होता.
याचवेळी जागतिक स्तरावर बुधवारी सोन्याच्या दरामध्ये घट झाली आहे. ब्लूमबर्गनुसार सोन्याची किंमत आज 3.76 डॉलरनी घटली आहे. तर जागतिक वायदा बाजारची किंमतही ०.०६ डॉलरने घटली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्याने देशातील बाजारपेठा बंद राहणार आहेत.