Gold Rates Today: सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या दर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 02:32 PM2020-08-20T14:32:30+5:302020-08-20T14:33:02+5:30
Gold Rates Today: आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या सत्रात सोन्याच्या किंमतीमध्ये 3.5 टक्क्यांची घट नोंदविली गेली. मात्र, आज रिकव्हरी केल्याचे दिसून आले.
गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेले सोन्या चांदीचे (Gold Rates) दर कमी होऊ लागले आहेत. रशिया आणि नंतर चीनची कोरोना लस आल्याने गुंतवणूकदारांनी खरेदी केलेले सोनो विकायला सुरुवात केली आहे. चांदीमधूनही गुंतवणूक सावधपणे काढून घेऊ लागले आहेत. यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली.
आज एमसीएक्सवरील वायदा बाजारात 2 ऑक्टोबरच्या सोन्याचा दर जवळपास 772.00 रुपये प्रति तोळा घसरला आहे. सकाळी बाजार सुरु होताच सोन्याचा दर 300 रुपयांनी कमी होऊन 52,320 प्रति 10 ग्रॅमवर आला होता. तर दुपारी दोन वाजता सोन्याच्या दराने 51850.00 रुपयांची पातळी गाठली आहे. सोन्याने दरम्यानच्या काळात 51721.00 रुपयांचा तळ गाठला होता.
तर चांदीच्या दरामध्येही मोठी घट झाली असून सध्या चांदी 1184.00 रुपयांनी प्रति किलो कमी झाली आहे. यामुळे चांदी सध्या 66763.00 रुपयांवर ट्रेंड करत आहे. सकाळी चांदी 67998 रुपये प्रति किलोवर होती. दरम्यानच्या काळात चांदीने 66401.00 रुपयांचा तळ गाठला होता.
गेल्या सत्रामध्ये म्हणजेच बुधवारी सोन्याच्या दरात 750 रुपयांची घसरण नोंदविली होती. तर चांदीमध्ये 1400 रुपयांची घसरण झाील होती. सोन्याने 56,191 रुपयांची विक्रमी झेप घेऊन पुन्हा अस्थिरतेकडे वाटचाल सुरु केली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजाराचाही परिणाम
आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या सत्रात सोन्याच्या किंमतीमध्ये 3.5 टक्क्यांची घट नोंदविली गेली. मात्र, आज रिकव्हरी केल्याचे दिसून आले. यामुळे आज हाजिर सोन्याचा दर 0.5 टक्क्यांनी वाढून 1,940 डॉलर प्रति औंस झाला होता.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मस्तच! गुगलकडे आहेत 20 लाख 'नोकऱ्या'; जॉब शोधण्यासाठी अॅप लाँच
तो तहसीलदार सोडा! खजिनदाराच्या घरात ट्रंकचे ट्रंक सोने चांदी सापडले; पोलीस मोजून दमले
लेस्बियन संबंधाआड येत होता पती; ग्राईंडरने तुकडे तुकडे केले, नाल्यात फेकले
'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही'; सुशांत-सीबीआय चौकशीवरून रोहित पवारांनी भाजपाला सुनावले
पोलखोल! तब्बल 27 वर्षे शिक्षकाची नोकरी केली, पगारही घेतला; बीएड मार्कशीट बनावट निघाले
एकतर्फी प्रेमाने घेतला डॉक्टर तरुणीचा जीव; मंगळावर रात्रीपासून होती गायब