Gold Rates Today: सोन्या, चांदीच्या दरात मोठी वाढ; झटपट जाणून घ्या आजचा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 11:38 AM2020-08-10T11:38:10+5:302020-08-10T11:41:02+5:30

Gold Rates Today: सोमवारी सकाळी काही मिनिटांतच सोन्याच्या दरात वाढ झाली. यावेळी सोन्याने 55,080 रुपयांचा कमाल स्तर आणि 54,978 रुपयांचा किमान स्तर गाठला.

Gold Rates Today: Gold, silver prices rise sharply; Get instant know today's rate | Gold Rates Today: सोन्या, चांदीच्या दरात मोठी वाढ; झटपट जाणून घ्या आजचा दर

Gold Rates Today: सोन्या, चांदीच्या दरात मोठी वाढ; झटपट जाणून घ्या आजचा दर

googlenewsNext

आज पुन्हा सोन्याच्या दरामध्ये (Gold Price Today) मोठी वाढ (Gold price hike) नोंदविली गेली आहे. आज सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीने 55049 रुपयांची उंची (Gold Rate) गाठली. गेल्या आठवड्यात सोन्याचा दर शक्रवारी 54,789 रुपये प्रति तोळा बंद झाला होता. 


सोमवारी सकाळी काही मिनिटांतच सोन्याच्या दरात वाढ झाली. यावेळी सोन्याने 55,080 रुपयांचा कमाल स्तर आणि 54,978 रुपयांचा किमान स्तर गाठला. सोन्यामध्ये कोरोना संकटामुळे गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. (Coronavirus impact on gold) यामुळे सोन्याच्या किंमती वाढत आहेत. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. एमसीएक्सवर चांदी सध्या 667 रुपयांनी वाढली आहे. 


सेन्सेक्सही वधारला
आज बाजार उघडताच सेन्सेक्सनेही उसळी घेतली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स 167.74 अंकांच्या वाढीने सुरु झाला. तर एनएसईचा निफ्टी 67.65 अंकवाढीने सुरु झाला. सध्या बीएसई 356.13 अंकांनी आणि एनएसई 114.25 वधारलेला असून बीएसई 38399.66 व निफ्टी 11330.40 वर आहे. 

गुंतवणूक करायची का?
एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार सोन्याच्या दरामध्ये सलग 16 व्या दिवशीही वाढ झाली आहे. काही तज्ज्ञांनुसार सोने 70000 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. जेपी मॉर्गनच्या एका अहवालानुसार सोने पुढील दोन महिन्यांत 70000 रुपयांवर जाणार आहे. कोरोनाचे संकट जरी टळले तरीही जागतिक अर्थव्यवस्थेला आलेली मंदी एवढ्यात सुधरणारी नाही. यामुळे जेव्हा आर्थिक संकट सुरुच राहणार तेव्हा सोन्याची मागणी वाढत राहणार आहे. सोन्यासोबत चांदीदेखील सारखी वाढत आहे. चांदीचा दर शुक्रवारी 576 रुपये प्रति किलो वाढून 77,840 रुपये किलो प्रति किलोग्रॅम झाला आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर शुक्रवारी 57008 प्रति तोळा झाला होता. 
एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ अधिकारी तपन पटेल यांनी न्यूज एजन्सी पीटीआयला सांगितले की, दिल्लीच्या वायदा बाजारात सोन्याने नवीन उंची गाठली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी 2,062 डॉलर प्रति औंस व 28.36 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर व्यवहार करत होते. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

24 तासांत 1007; देशातील आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबळी

पाकिस्तानला सौदी अरेबियाचा दणका; कच्च्या तेलाचा पुरवठाच तोडला

Gold Rate: सोन्याची झळाळी! दिवाळीपर्यंत 70000 वर जाण्याची शक्यता; गुंतवणूक करायची का?

लाईव्ह आत्महत्येचा प्रयत्न थांबविण्यासाठी जेव्हा थेट आयर्लंडच्या फेसबुकमधून फोन आला...

संजय राऊत खोटारडे! सुशांतच्या वडिलांनी दोन लग्ने केली नाहीत; मामाचा खुलासा

चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार'

Web Title: Gold Rates Today: Gold, silver prices rise sharply; Get instant know today's rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.