देशात सोने खरेदीला उधाण; मागणी वाढल्याने आयात ७३ टक्क्यांवर, व्यापारी तुटीतही मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 07:29 AM2022-03-14T07:29:27+5:302022-03-14T07:29:50+5:30

वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मागणी जास्त असल्याने सोन्याची आयात वाढली आहे.

Gold rush in the country; Imports up 73 per cent due to increased demand; Large increase in trade deficit | देशात सोने खरेदीला उधाण; मागणी वाढल्याने आयात ७३ टक्क्यांवर, व्यापारी तुटीतही मोठी वाढ

देशात सोने खरेदीला उधाण; मागणी वाढल्याने आयात ७३ टक्क्यांवर, व्यापारी तुटीतही मोठी वाढ

Next

नवी दिल्ली : युद्धामुळे शेअर बाजारात होत असलेल्या चढउतारामुळे गुंतवणूकदारांचा ओढा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळला आहे. त्यामुळे  चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यांत (एप्रिल - फेब्रुवारी)  देशाची सोने आयात ७३ टक्क्यांनी वाढून ४५.१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, तर दुसरीकडे सामान्य नागरिक मात्र घरातील सोने गहाण ठेवत असल्याचे समोर आले आहे.

वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मागणी जास्त असल्याने सोन्याची आयात वाढली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत सोन्याची आयात २६.११ अब्ज डॉलर होती. मौल्यवान धातूची आयात फेब्रुवारी २०२२मध्ये ११.४५ टक्क्यांनी घसरून ४.७ अब्ज डॉलरवर आली आहे. पहिल्या ११ महिन्यांत सोन्याच्या आयातीत वाढ झाल्याने देशाची व्यापार तूटही वाढली आहे. व्यापार तूट २०२१-२२च्या पहिल्या ११ महिन्यांत १७६ अब्ज डॉलर झाली आहे, जी मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ८९ अब्ज डॉलर होती.

चीननंतर भारत हा सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. ज्वेलरी उद्योगासाठी सोने प्रामुख्याने आयात केले जाते. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर या पहिल्या नऊ महिन्यांत हिरे आणि दागिन्यांची निर्यात ५७.५ टक्क्यांनी वाढून ३५.२५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. आरबीआयच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत देशाची चालू खात्यातील तूट ९.६ अब्ज डॉलर किंवा जीडीपीच्या १.३ टक्के होती.

मासिक आयात ७६.५७ टन 

एप्रिल - फेब्रुवारी २०२२मध्ये सोन्याची मासिक आयात सरासरी ७६.५७ टन होती, जी सामान्य पातळीपेक्षा कमी आहे. ते म्हणाले की, या काळात ८४२.२८ टन सोन्याची आयात झाली आहे, जी सामान्य आयातीपेक्षा कमी आहे, असे रत्न आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष कोलीन शाह यांनी म्हटले आहे.

५ वर्षांतील सर्वाधिक आयात

जानेवारी आणि फेब्रुवारी २०२२मध्ये आयात केलेले सोने हे मागील तीन सामान्य वर्षांमध्ये २०१७-२०१८, २०१८-२०१९ आणि २०१९-२०२० या कालावधीतील प्रमाण मूल्याच्या बाबतीत सरासरी सोन्याच्या आयातीपेक्षा खूप जास्त आहे, असे शाह यांनी म्हटले आहे. २०२१मध्ये  विविध देशांमध्ये निर्बंध शिथिल होताच, सोन्याचा विस्कळीत पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यानंतर निर्यात वाढली.

Web Title: Gold rush in the country; Imports up 73 per cent due to increased demand; Large increase in trade deficit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.