काशी विश्वनाथमध्येही झाला सोन्याचा घोटाळा, तपास करा: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 05:31 AM2024-07-26T05:31:15+5:302024-07-26T05:32:28+5:30

केवळ बाबा केदारनाथ धाममध्येच नाही तर बाबा विश्वनाथसह देशातील इतर अनेक मंदिरांमध्येही सोन्याचा घोटाळा झाला आहे.

gold scam also happened in kashi vishwanath investigate said shankaracharya avimukteshwaranand maharaj | काशी विश्वनाथमध्येही झाला सोन्याचा घोटाळा, तपास करा: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज

काशी विश्वनाथमध्येही झाला सोन्याचा घोटाळा, तपास करा: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज

केवळ बाबा केदारनाथ धाममध्येच नाही तर बाबा विश्वनाथसह देशातील इतर अनेक मंदिरांमध्येही सोन्याचा घोटाळा झाला आहे. काशी विश्वनाथाच्या गर्भगृहात कोणते सोने आहे, जे ६ महिन्यांत पितळेचे झाले आहे. देवाची फसवणूक झाली असेल तर ती पुढे यावी, असे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदजी महाराज यांनी म्हटले आहे.

१० दिवसांपूर्वी अविमुक्तेश्वरानंद यांनी केदारनाथमधून २२८ किलो सोन्याची चोरी झाल्याचा दावा केला होता. आजही ते त्यांच्या दाव्यावर ठाम आहेत.  ते म्हणाले की, आमचे राजा रणजित सिंह यांनी काशी विश्वनाथावर सोन्याचा मुलामा चढवला होता. किती वर्षे झाली तरी सोन्याची चमक उतरलेली नाही; पण गर्भगृहातील सोन्याची चमक कमी झाली आहे. याची चौकशी करण्याची मागणी गरज आहे. मात्र, आम्हालाच आरोपी बनवून बदनाम करण्याचा प्रयत्न कला जात आहे.

सीईओ म्हणाले...

काशी विश्वनाथ धाम मंदिराचे सीईओ विश्वभूषण मिश्रा म्हणाले की, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सनातन धर्माचे सर्वश्रेष्ठ गुरू असल्याने कदाचित त्यांना दिव्य दृष्टीतून कळले असेल. आरतीमुळेही भिंतीवर काजळी येते. सोन्याची चमक कुठेही कमी झालेली नाही.

 

Web Title: gold scam also happened in kashi vishwanath investigate said shankaracharya avimukteshwaranand maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.