Gold Smuggling: तस्करीची अनोखी शक्कल! विगमध्ये लपवले 33 लाखांचे सोने, अधिकारी झाले थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 02:43 PM2022-02-20T14:43:02+5:302022-02-20T14:46:42+5:30
दुबईवरुन आलेल्या दोन प्रवाशांकडून एकून 45 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे.
वाराणसी: सोने-चांदी किंवा इतर वस्तुंची तस्करी करणारे नवनवीन शक्कल लढवत असतात. पण, तस्कराने कितीही शक्कल लढवली, तरी अधिकाऱ्यांच्या नजरेतून त्यांची ही तस्करी सुटत नाही. अशाच प्रकारची एक घटना उत्तर प्रदेशातील वाराणसी विमानतळावर घडली आहे. येथील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी शनिवारी यूएईहून परतलेल्या दोन प्रवाशांकडून 45 लाख रुपयांचे सोने जप्त केले.
व्हिडिओ व्हायरल
शारजाहून आलेल्या एअर इंडियाच्या विमानातील एका प्रवाशाने हे सोने आपल्या विगखाली(खोटे केसं) एका पाऊचमध्ये लपवले होते. विगच्या आत लपवलेले हे सोने अधिकाऱ्यांनी जप्त केले असून, या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये अधिकारी डोक्यावर लावलेला विग काढताच आत एका काळ्या पॅकेटमध्ये सोने लपवलेले दिसत आहे. एनडीटीव्हीने याबाबतचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
शारजाह से wig में छिपाकर लाया 32 लाख का सोना,वनारस एयरपोर्ट पर कस्टम विभाग ने निकाली विग ,सोना बरामद आरोपी गिरफ्तार pic.twitter.com/v4FcPqHYGh
— Mukesh singh sengar मुकेश सिंह सेंगर (@mukeshmukeshs) February 20, 2022
लाखोंचा मुद्देमाल जप्त
अधिकाऱ्यांनी सांगितले की, विगमध्ये लपवलेल्या सोन्याचे वजन 646 ग्रॅम असून त्याची किंमत 32.97 लाख रुपये आहे. त्याच फ्लाइटमधील आणखी एका प्रवाशाकडून 238.2 ग्रॅम सोने सापडले आहे, ज्याची किंमत ₹12.14 लाख आहे. हे सोने प्रवाशाने पुठ्ठ्याला गुंडाळण्यासाठी वापरलेल्या प्लास्टिकच्या थरांमध्ये लपवले होते.
दिल्लीतून दोन तस्कर अटकेत
नुकतेच दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दोन तस्करांना पकडण्यात आले. त्यापैकी एकाने सोन्याची पेस्ट आणली होती तर दुसऱ्यान परदेशी बनावटीच्या सिगारेट आणल्या होत्या. हे दोघे शारजाहून परतलेले होते. या विदेशी बनावटीच्या सिगारेटची किंत 9,54,000 रुपये आहे. याशिवाय 268 ग्रॅम सोन्याची पेस्टही जप्त करण्यात आली असून त्याची किंमत 12,20,090 रुपये आहे. प्रवाशांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.