सेवानिवृत्त नायब तहसीलदाराच्या पत्नीची सोन्याची पोत लांबवली

By Admin | Published: April 10, 2016 10:37 PM2016-04-10T22:37:48+5:302016-04-10T22:37:48+5:30

जळगाव: जेवण झाल्यानंतर फिरायला आलेल्या तारा लखीचंद परदेशी (वय ५८ रा.रिधुरवाडा, शनी पेठ जळगाव) या महिलेची २० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरट्याने लांबवल्याची घटना शनिवारी रात्री साडे दहा वाजता शहर पोलीस स्टेशनसमोरील फुले मार्केटजवळ घडली. यातील संशयितास अठरा तासाच जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. परदेशी या सेवानिवृत्त नायब तहसीलदार लखीचंद परदेशी यांच्या पत्नी आहेत.

The gold vessel of retired nb tehsildar was terminated | सेवानिवृत्त नायब तहसीलदाराच्या पत्नीची सोन्याची पोत लांबवली

सेवानिवृत्त नायब तहसीलदाराच्या पत्नीची सोन्याची पोत लांबवली

googlenewsNext
गाव: जेवण झाल्यानंतर फिरायला आलेल्या तारा लखीचंद परदेशी (वय ५८ रा.रिधुरवाडा, शनी पेठ जळगाव) या महिलेची २० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरट्याने लांबवल्याची घटना शनिवारी रात्री साडे दहा वाजता शहर पोलीस स्टेशनसमोरील फुले मार्केटजवळ घडली. यातील संशयितास अठरा तासाच जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. परदेशी या सेवानिवृत्त नायब तहसीलदार लखीचंद परदेशी यांच्या पत्नी आहेत.
शनिवारी रात्री जेवण झाल्यानंतर तारा परदेशी या घराकडून चालत फुले मार्केटकडे आल्या. मार्केटच्या बाहेर भगवती रसवंतीजवल रस्त्यावर रिक्षाचा कट लागल्यामुळे दुचाकीस्वार खाली पडल्याने तेथे गर्दी झाली होती. त्याचवेळी एक तरुण समोरुन आला व तारा यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून मार्केटमध्ये पळून गेला. तारा परदेशी यांनी आरडाओरड केली तोपर्यंत तो तरुण पसार झाला होता. काही जणांनी मार्केटच्या दिशेने धाव घेतली,परंतु उपयोग झाला नाही. या पोतमध्ये मनी मंगळसूत्र, ४८ बारीक मणी, चार डोळ व दोन वाट्या होत्या.
वर्णनावरुन चोरट्यास पकडले
या घटनेनंतर तारा परदेशी यांनी शेजारीच असलेले शहर पोलीस स्टेशन गाठून सहायक निरीक्षक दीपक गंधाले यांना झाल्याप्रकाराची माहिती दिली. रात्री एक वाजता अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. परदेशी यांनी सांगितलेल्या वर्णनावरुन गंधाले यांनी चोरट्याच्या शोधासाठी पथक तयार केले. उपनिरीक्षक सुरेश सपकाळे, विजयसिंग पाटील, गणेश शिरसाळे यांनी मिळालेल्या माहितीवरुन तांबापुरातील तरुणाला ताब्यात घेतले.त्याने चोरीची कबुलीही दिली. अल्पवयीन असल्याने त्याला अटक केली नाही. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती गंधाले यांनी दिली.

Web Title: The gold vessel of retired nb tehsildar was terminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.