सोने ‘जैसे थे’
By admin | Published: June 9, 2014 11:52 PM2014-06-09T23:52:22+5:302014-06-09T23:52:22+5:30
सराफा व्यापारी आणि ग्राहकांकडून चांगला उठाव न मिळाल्याने सोमवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 27,1क्क् रुपये प्रतितोळ्यावर कायम राहिला.
Next
>नवी दिल्ली : सराफा व्यापारी आणि ग्राहकांकडून चांगला उठाव न मिळाल्याने सोमवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 27,1क्क् रुपये प्रतितोळ्यावर कायम राहिला. दुसरीकडे जागतिक बाजारात सोन्याच्या भावात काही प्रमाणात वाढ नोंदली गेली. औद्योगिक संस्था आणि नाणो निर्मात्यांकडून चांगली मागणी मिळाल्याने चांदीचा भाव मात्र, 125 रुपयांनी वधारून 4क्,75क् रुपये प्रतिकिलो झाला.
बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफा व्यापा:यांकडून चांगली मागणी न मिळाल्याने सोन्याचा भाव कायम राहिला. समभाग बाजार ङोपावत असल्याने गुंतवणूकदार सोन्यातली गुंतवणूक काढून घेत आहेत. याचा बाजारधारणोवर नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले. दिल्ली बाजारातच 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव अनुक्रमे 27,1क्क् आणि 26,9क्क् रुपये प्रतितोळा कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)