सोने महागले आणि चांदी मात्र उतरली

By admin | Published: June 28, 2016 03:38 AM2016-06-28T03:38:02+5:302016-06-28T03:38:02+5:30

जागतिक पातळीवरील तेजीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सोने १५० रुपयांनी वाढून ३०,५५० रुपये प्रति १० ग्रॅम झाले.

Gold went up and silver only dropped | सोने महागले आणि चांदी मात्र उतरली

सोने महागले आणि चांदी मात्र उतरली

Next


नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील तेजीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सोने १५० रुपयांनी वाढून ३०,५५० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. चांदी मात्र २९० रुपयांनी घसरून ४२,१०० रुपये प्रति किलो झाली.
सिंगापूर येथील बाजारात सोने १.५ टक्के वाढून १.३३५.५५ डॉलर प्रति औंस झाले. याचा लाभ देशांतर्गत बाजारातही झाला. त्यातच दागिने निर्मात्यांनी खरेदी वाढविल्याने सोने चकाकले. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १५० रुपयांनी वाढून अनुक्रमे ३०,५५० रुपये आणि ३०,४०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. शनिवारी सोने ४८५ रुपयांनी घसरले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव १०० रुपयांनी वाढून २३,४०० रुपये झाला. दिल्लीत चांदी ४२,१०० रुपये किलोवर आली. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव २४० रुपयांनी वाढून ४२,३९० रुपये किलो तर, शिक्याचा भाव खरेदीसाठी ७२ हजार व विक्रीसाठी ७३ हजार रुपये प्रति शेकडा असा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold went up and silver only dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.